चुकीचे प्रस्ताव पाठविल्याने आठ कोटींची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:39 AM2019-08-02T11:39:29+5:302019-08-02T11:40:26+5:30

५८ कोटींच्या कामांना मंजुरीची प्रतीक्षा : ४२ कोटींच्या कामांना मान्यता

 Sending wrong proposals kept the work of eight crore | चुकीचे प्रस्ताव पाठविल्याने आठ कोटींची कामे रखडली

चुकीचे प्रस्ताव पाठविल्याने आठ कोटींची कामे रखडली

googlenewsNext


जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत १६ आॅगस्ट २०१८ रोजी मंजूर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीपैकी ४२ कोटी रुपयांच्या कामांना शासनाने मंजूरी दिली आहे. तसेच या कामांच्या लवकरच निविदा काढून आचारसंहितेपुर्वी कामांना सुरु करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी गुरुवारी महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, भाजपा गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे आदी उपस्थित होते.
शासनाच्या नगर विकास विभागाकडून याबाबतचा निर्णय गुरुवारी प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती मिळाली.
५८ कोटींना लवकरच मान्यता
मनपाला मिळालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीचे ५०-५० कोटींचे दोन प्रस्ताव शासनाक डे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी मार्च महिन्यात पाठविलेल्या ५० कोटी रुपयांच्या कामांपैकी ४२ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
तसेच उर्वरित ५८ कोटींच्या कामांना देखील लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.
मनपा हिश्श्यातील निधी १४ वित्त आयोगातून वर्ग करणार
नगरोथ्थान अंतर्गत मिळणाऱ्या निधीतून ३० टक्के निधी हा संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिश्श्यातून ३० टक्के रक्कम घेतली जाते. मात्र, मनपाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने ही रक्कम देणे शक्य नसल्याने हा निधी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली.
आचारसंहितेआधी कार्यादेश
दरम्यान, लवकरच ४२ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्यात येणार आहे. आचारसंहितेच्या आधीच कार्यादेश देवून कामे सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
हुडकोचा प्रश्नही मार्गी लागणार
तसेच हुडकोकर्ज फेडीचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागणार असून, मलनिस्सारण योजनेसंदर्भात देखील सोमवारी मंजुरी मिळणार असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली.
यावेळी शहरातील अनेक प्रभागातील नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.
बॅँक खाते उघडण्यासाठी मनपाची डिआरएटीत धाव
हुडको कर्जप्रकरणी २६ जूनपासूून डीआरटीच्या आदेशानुसार अ‍ॅक्सीस बॅँकेचे खाते सीलच आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इतर बँक खाते उघडली असली तरी अ‍ॅक्सीस बॅकेंने मनपाचे खाते उघडलीच नसल्याने मनपाने याबाबत आता डिआरएटी मध्ये धाव घेतली असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. हुडकोच्या कर्जफेडप्रकरणी जून महिन्यात महापालिकेचे तीन बँकांमधील खाते गोठविण्यात आले होते. दरम्यान, मनपाने मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करून ही न्यायालयाने खाते उघडण्याचे आदेश दिले होते. मात्र, अ‍ॅक्सीस बॅॅँकेने हे खाते उघडले नसल्याने मनपाच्या आर्थिक कामांवर परिणाम होत आहे. याबाबत अ‍ॅक्सीस बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतरही बॅँक प्रशासन डिआरएटीच्या आदेशावर ठाम असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. अ‍ॅक्सीस बॅँकेने महिनाभरापासून खाते उघडलेलेच नाही. मनपा अंतर्गत काम करणाºया मक्तेदारांचीही बिले थांबविण्यात आले आहेत. दरम्यान, आता मनपाने डिआरएटीमध्ये धाव घेतली आहे.
मनपाच्या चुकीमुळे ८ कोटींच्या कामांचे पुन्हा पाठवावे लागतील प्रस्ताव
मनपाने एकूण ५० कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४२ कोटींच्या रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली मात्र ८ कोटींचे कामे हे नगरोथ्थान अंतर्गत निधीमध्ये होवू शकत नसल्याने हा प्रस्ताव शासनाकडून फेटाळून लावण्यात आला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाला पुन्हा ८ कोटींच्या कामांचे प्रस्ताव नव्याने पाठवावे लागणार आहेत. नगरोथ्थानच्या परिपत्रकात कामांबाबत स्पष्ट नियमावली असतानाही प्रशासनातील अधिकाºयांचा गलथानपणामुळे हा प्रस्ताव नव्याने पाठवावा लागणार आहे.

Web Title:  Sending wrong proposals kept the work of eight crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.