भुसावळच्या ज्येष्ठ नागरिकांनी परप्रांतीय आठ मजुरांना दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 07:20 PM2020-07-21T19:20:51+5:302020-07-21T19:21:01+5:30
रेल्वे तिकिटासह जेवणाची केली व्यवस्था
भुसावळ : औरंगाबाद येथील एका ठेकेदाराने उत्तरप्रदेशातील सुलतानपूर (प्रयागराज) येथील ८ मजुरांना एक महीन्यापासून मजुरीचे पैसे न देता धमकी देऊन कामावरून गावी परत जाण्यास भाग पाडले होते. यानंतर हे आठ मजुर रातोरात औरंगाबाद येथून भुसावळसाठी पायी निघून भुसावळ येथून रेल्वेने जाण्यासाठी निघाले होते. त्यांना भुसावळ येथील ज्येष्ठ नागरिकांनी मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
भुसावळ स्थानकावरील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राजवळ त्यांना तिकीटांच्या काही दलालांनी हेरून एका तिकीटासाठी हजार ते बाराशे रूपयांची अतिरिक्त मागणी केली. पैसे कमी असल्याने निराश होवून ते सर्व मजुरी पायी सुलतानपुर (इलाहाबाद/ प्रयागराज) जाण्यासाठी निघाले होते. दरमयन १५ बंगला,वरणगाव रोडवर तेथील ज्येष्ठ नागरिक ग्रुपला ते दिसले. विचारपूस केली असता ते हैराण झाल्याने रडू लागले. त्यांचे हाल पाहून या मजुरांना ज्येष्ठ नागरिकांनी मदतीचे आश्वासन दिले. या आठ मजुरांकडील काही व काही मदत एकत्र करून २१ जुलै रोजी ०९०८३ डाऊन या गाडीचे तात्काळ रेल्वेचे तिकीट काढून त्यांना १९ जुलै पासून त्यांचा निवास, नाश्ता व जेवणाची सोय करून दिली.
२१ रोजी सकाळी त्यांना आपल्या गावी सुलतानपुरसाठी रेल्वेने रवाना केले.