साठे आठ तासांपपर्यंत ताटकळले ज्येष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:17 AM2021-05-07T04:17:47+5:302021-05-07T04:17:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून याचे अत्यंत वेदनादायी वास्तव रेडक्रॉस रक्तपेढीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून याचे अत्यंत वेदनादायी वास्तव रेडक्रॉस रक्तपेढीच्या केंद्रावर पाहायला मिळाले. आठ आठ तासांपर्यंत ज्येष्ठांना लसीसाठी ताटकळत राहावे लागले. अनेक जण खाली बसून होते. उन्हात तरी किमान सकाळी लवकर ही प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी या ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
सकाळी सहा वाजेपासून या केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, सकाळी साडेदहा वाजेपासून कूपन वाटायला सुरूवात झाली. मात्र, या कालावधीत सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाला होता. शिवाय ज्यांची ऑनलाईन नोंदणी झाली होती अशा १८ ते ४४ वयोगटाला आधी लस दिली जात होती. त्यामुळे ज्येष्ठांना ताटकळावे लागले.
कोट
सकाळी सहापासून आम्ही लसीचा दुसरा डोस घ्यायला आलेलो होते. मात्र, नियोजन नसल्याने ज्येष्ठांचे प्रचंड हाल झाले. साडे दहा वाजेपासून कूपन वाटायला सुरुवात झाली. दुपारी आम्हाला लस मिळाली. मात्र, या वेळेत प्रचंड त्रास झाला. मे च्या उन्हात अधिक त्रास ज्येष्ठांना सहन करावा लागला. प्रचंड गर्दी झालेली होती. - नंदकिशोर उपाध्याय
आठ ते साठे आठ तास लस घ्यायला लागले. ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत होता. ज्यांना सहन होत नव्हते ते खालीच बसून होते. अन्य केंद्रावर जर लवकर प्रक्रिया सुरू होते तर या केंद्रावर पण सकाळी लवकर प्रक्रिया सुरू व्हावी, जेणे करून ज्येष्ठ नागरिकांना या उन्हाचा त्रास होणार नाही. - सोपान नारखडे