मी शरद पवार अन् राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला; मात्र त्यांनीच मला मंत्री केलं- गुलाबराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 02:06 PM2022-04-15T14:06:47+5:302022-04-15T14:07:07+5:30

पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आज शरद पवारांचे तोंड भरून कौतुक केलं.

Senior Shiv Sena leader Gulabrao Patil has praised NCP president Sharad Pawar | मी शरद पवार अन् राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला; मात्र त्यांनीच मला मंत्री केलं- गुलाबराव पाटील

मी शरद पवार अन् राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला; मात्र त्यांनीच मला मंत्री केलं- गुलाबराव पाटील

Next

जळगाव- आपण सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा विरोध केला. मात्र त्याच शरद पवारांमुळे आपल्याला मंत्रिपद मिळालं. ही बाब अतिशय आश्‍चर्यकारक असल्याचे नमूद करत पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आज शरद पवारांचे तोंड भरून कौतुक केलं.

स्वतंत्रसेनानी आणि  माजी आमदार स्व. मुरलीधर अण्णा पवार यांच्या धरणगाव तालुक्यातील चांडसर येथील पुतळ्याचं शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण झालं. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील शरद पवारांचे कौतुक केलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलणारा नेते आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, कोणी पहिलवान बाकी नाही. पण शरद पवारांनी एका रात्रीत चित्र बदललं, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं.

काहीतरी करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. 'हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे' असं एकनाथ खडसे म्हणाले. सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही ते म्हणाले. शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं. 

गृहमंत्रीसाहेब जरा कडक भूमिका घ्या- खडसे

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जरा कडक भूमिका घेऊन भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवण्याचे आवाहन देखील एकनाथ खडसे यांनी केले आहे. 

Web Title: Senior Shiv Sena leader Gulabrao Patil has praised NCP president Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.