कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात ज्येष्ठांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:17 AM2021-03-10T04:17:54+5:302021-03-10T04:17:54+5:30

जळगाव : ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवंरील अन्य व्याधी असलेल्या नागरिकांचे जिल्ह्यातील खासगी व शासकीय केंद्रांमध्ये ...

Seniors take the lead in vaccinating against corona | कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात ज्येष्ठांचा पुढाकार

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात ज्येष्ठांचा पुढाकार

Next

जळगाव : ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवंरील अन्य व्याधी असलेल्या नागरिकांचे जिल्ह्यातील खासगी व शासकीय केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे. यात आठवड्याचा कालावधी लोटला असून, अन्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक स्वत:हून पुढे आले आहेत. लसीकरणासाठी शासकीयच नव्हे, तर खासगी केंद्रांवरपण गर्दी होत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरात पाच हजारांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. यात मात्र, अन्य व्याधी असलेल्या ४५ ते ५९ वयोगटांतील नागरिकांची संख्या मात्र कमी आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्या टप्प्याने केंद्र वाढविण्यात आले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, त्यानंतर काही दिवसांनी महसूल व पोलीस त्यानंतर, जि. प., पं. स, ग्रामपंचायत अशा विविध प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे यात ६०७७ कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे.

आरोग्य केंद्रांमध्ये सुरुवात

आता ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यात पहिल्याच दिवशी ११८७ लोकांनी लस घेतली. यात ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. शिवाय रोटरी भवनातील केंद्रांवर गेल्या तीन दिवसांपासून दररोज दोनशे, मनपा रुग्णालयात रोज सरासरी साडेतीनशे नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यामुळे अन्य व्याधी असलेल्यांपेक्षा ज्येंष्ठांचा लसीकरणासाठी पुढाकार असल्याचे चित्र आहे.

३३०५२

जणांनी आतापर्यंत घेतली लस

ज्येष्ठ नागरिक : ४०७१ (७ मार्चपर्यंतची आकडेवारी)

४५ ते ५९ वर्षांपर्यंत अन्य व्याधी असलेले : १३१

६० वर्षांवरील महिला: १७४९

पुरुष : २३२२

पुरुषांचे प्रमाण अधिक

ज्येष्ठ नागरिकांमध्ये ७ मार्चच्या आकडेवारीनुसार विचार केल्यास महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण लसीकरणात अधिक आहे. गेल्या दोन दिवसांत हे प्रमाण वाढले असून, आता केंद्र वाढविण्यात आल्याने लस घेतलेल्या ज्येष्ठांची संख्या ही पाच हजारांपेक्षा अधिक गेल्याची माहिती

मी लस घेतली तुम्ही?

आम्ही चौघेजण ज्येष्ठ नागरिकांनी रोटरी भवनातील केंद्रावर लस घेतली. व्यवस्थित मार्गदर्शन व चांगल्या सुविधेत लसीकरण झाले. परिचारिका अत्यंत कुशल होत्या. त्यांनी टोचलेली सुई समजतदेखील नाही. तासाभरात आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. - प्रा. एस. व्ही. सोमवंशी

Web Title: Seniors take the lead in vaccinating against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.