जन्मभूमीत आले १६ डॉक्टर्स सेवेसाठी, अनोख्या शिबीराचा 520 रूग्णांना लाभ
By admin | Published: December 25, 2016 01:26 PM2016-12-25T13:26:27+5:302016-12-25T13:26:27+5:30
१६ भूमिपुत्र डॉक्टरांनी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या अनोख्या मोफत शिबिराचे आयोजन केले होते. आपल्या जन्मभूमीच्या ऋणाची जाण ठेवत शहरात
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 25 - येथील भडगाव तालुक्यातील वडगाव बु. गावाच्या १६ भूमिपुत्र डॉक्टरांनी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या अनोख्या मोफत शिबिराचे आयोजन केले होते. आपल्या जन्मभूमीच्या ऋणाची जाण ठेवत शहरात असेलेल्या या डॉक्टर मंडळींनी आपल्या गावाकडे धाव घेत या मोफत रोगनिदान शिबिरात ५२० रुग्णांची तपासणी करुन उपचारही केले.
शहरात वैद्यकीय सेवा बजावणारे श्री माताजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डॉ.विशाल पाटील व डॉ.अर्चना पाटील यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. शिबिरात डॉक्टरांनी निदान, उपचार, औषधोपचार केला. गावासह परिसरातील नागरिकांसाठी सर्व प्रकारची सेवा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. रुग्णांना मोफत औषधींचे वाटपही करण्यात आले. गरोदर महिलांची तपासणी करुन, प्रोटीन पावडर, आयर्न कॅल्शियमच्या गोळ्याही दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवेंद्रसिंग पाटील होते. संस्कार बावन्नी या श्री माताजी चॅरिटेबल ट्रस्टने तयार केलेल्या पुस्तीकेचे प्रकाशनही यावेळी झाले. यावेळी डॉ.सुनील पाटील, उसपरपंच मुरलीधर वाघ, ग्रा,पं. सदस्य अंबर गुरुजी, दीपक माळी, धरम महाजन, शरद पाटील, बाळासाहेब पाटील, विकासोचे चेअरमन दीपक पाटील, दिनकर पाटील, पंडित पाटील, बापू पाटील, प्रकाश पाटील, विनोद पाटील, डॉ.प्रकाश पाटील, रामलाल महाजन, पोलीस पाटील विजयसिंग पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप पाटील, प्रेमसिंग पाटील, मंगलसिंग पाटील आदी उपस्थित होते.
विक्की पाटील, मोनू पाटील, संग्राम पाटील, बंटी पाटील, सुनील पाटील, विक्रम पाटील, निलेश पाटील, निलेश खैरनार, रवी पाटील, दीपेश पाटील, रोहित पाटील, बापू पाटील, भैया पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. रणजित पाटील यांनी केले. (वार्ताहर)