सर्वसामान्यांची सेवा करून आईचे ऋण फेडतोय
By admin | Published: May 14, 2017 06:23 PM2017-05-14T18:23:46+5:302017-05-14T18:23:46+5:30
सर्वसामान्यांची सेवा करून फेडण्याचा प्रय} करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी आईविषयी भावना व्यक्त करताना सांगितले.
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 14 - आईचे संस्कार, तिने दिलेले व्यवहारज्ञान आणि माङयासह भावंडांना घडविण्यासाठी केलेले कष्ट यामुळेच आपण आज या पदार्पयत पोहचू शकलो.. आईचे ऋण मी सर्वसामान्यांची सेवा करून फेडण्याचा प्रय} करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी आईविषयी भावना व्यक्त करताना सांगितले.
मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, पृथ्वीवरचे दैवत ही आई आह़े देवाला प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी सोडवता याव्या म्हणून तो आईच्या रुपात येत असल्याचे सांगण्यात येते. आईला पाहून ते खरेही वाटत़े आम्ही सात भावंड़ त्यात सहा बहिणी व मी सर्वात लहान. आमच्या आईने काबाड कष्ट करीत आम्हाला वाढविल़े शिक्षण दिल़े प्रसंगी स्वत: अर्धउपाशी राहून आमचे शिक्षण पूर्ण केले. शेतात राबून त्यातून जादा मिळणारे पाच रुपयेदेखील ती स्वत:कडे न ठेवता तार पाठवून आम्हाला शिक्षणाला उपयोगात येईल म्हणून देत असल्याच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या़
मी नेहमीच वेळ मिळेल तसे आईवर लिहण्याचा प्रयत्न करीत असतो़ आईच्या मायेची उब कितीही लांब असलो तरी सदैव जाणवत असत़े मागे वळून बघताना आई पाठीशी ठामपणे उभी नसती तर काय झाले असते असा प्रश्नही मला अनेकवेळा पडतो़ त्यामुळे सर्वसामान्यांची सेवा करून आईचे ऋण फेडण्याचा आपला प्रय} असतो.