भोरगाव लेवा पंचायतचे ४ फेब्रुवारी रोजी अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 04:54 PM2018-01-16T16:54:35+5:302018-01-16T17:03:29+5:30
समाजाने सहभागी व्हावे, कुटुंब नायक रमेश पाटील यांचे आवाहन
आॅनलाईन लोकमत
यावल, दि.१६ : तालुक्यातील पाडळसे येथे ४ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या जागतिक भोरगाव लेवा पंचायतच्या एक दिवशीय अधिवेशनात समाजातील समस्यांचे चिंतन व मंथन होणार आहे. त्यामुळे सर्व लेवा समाज बांधवांनी अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी शहरातील बाजार समितीच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या बैठकीत केले आहे.
४ फेब्रुवारी रोजी पाडळसे (ता.यावल) येथे भोरगाव लेवा पंचायतचे महा अधिवेशन होत आहे. तेव्हा या अधिवेशनाच्या पूर्व तयारीसाठी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात लेवा समाज बांधवांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीला प्रमुख उपस्थितीत आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार रमेश चौधरी, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे, जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहेते, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जि.प.चे माजी सदस्य हर्षल पाटील, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, बाजार समितीचे संचालक नारायण चौधरी, राकेश फेगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना कुटुंब नायक रमेश पाटील यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे निमत्रंक संपूर्ण यावल तालुका आहे. तालुक्यातील समाज बांधवांवर मोठी जबाबदारी आहे. तेव्हा प्रत्येकाने या करीता पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रशांत चौधरी यांनी मानले.