भुसावळात साडेतीन लाखांचा गुटका जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:48 AM2018-10-28T00:48:44+5:302018-10-28T00:49:44+5:30

वरणगावकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपगाडीत तब्बल तीन लाख ३५ हजार पाचशे रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे.

Seven and a million pieces of money seized in Bhusaval | भुसावळात साडेतीन लाखांचा गुटका जप्त

भुसावळात साडेतीन लाखांचा गुटका जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव येथील दोन जणांना अटकभुसावळच्या बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ, जि.जळगाव : वरणगावकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपगाडीत तब्बल तीन लाख ३५ हजार पाचशे रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. या घटनेत जळगाव येथील दीपक रमेश चेतावणी (वय १८) व सिमरन रमेश चेतावणी (वय ३८) दोन्ही रा. प्रेम गल्ली, सिंधी कॉलनी या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
पो.ना.परदेशी व पो.कॉ.पाटील हे खडका चौफुलीवर कर्तव्यावर असताना वरणगावकडून येणाºया व जळगावकडे जाणाºया वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी वरणगावकडून जीप (क्रमांक एमएच-१९-सीयू-८४१४) गाडी भरधाव वेगाने येत होती. या जीपला खडका चौफुलीजवळ थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र चालकाने पोलिसांना पाहून ही गाडी न थांबता ती जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या दोन्ही पोलीस कर्मचाºयांना गाडीचा संशय आल्यामुळे त्यांनी मोटारसायकलने या गाडीचा पाठलाग केला. गाडी नाहाटा महाविद्यालय चौफुलीजवळ हळू होताच या गाडीला मोटारसायकल आडवी लावली व गाडी ताब्यात घेतली. गाडीची झडती घेतली. त्यात लाख ३५ हजार पाचशे रुपये किमतीचा गुटका ताब्यात घेतला. त्याचप्रमाणे दीपक रमेश चेतावणी (वय १८) व सिमरन रमेश चेतावणी (वय ३८) दोन्ही रा. प्रेम गल्ली, सिंधी कॉलनी जळगाव यांना अटक केली. पोलीस नाईक नंदकुमार प्रकाश परदेशी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला भादवि कलम २७९, मोटारवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Web Title: Seven and a million pieces of money seized in Bhusaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.