व्यापारी गाळेधारकांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:43 AM2021-02-20T04:43:46+5:302021-02-20T04:43:46+5:30
जळगाव : शहरातील नेरी नाका परिसरातील ४० भूखंडधारकांनी नजराणा चुकवल्याप्रकरणी गुरुवारी महसूल विभागाच्या पथकाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार होती. ...
जळगाव : शहरातील नेरी नाका परिसरातील ४० भूखंडधारकांनी नजराणा चुकवल्याप्रकरणी गुरुवारी महसूल विभागाच्या पथकाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार होती. मात्र या भूखंडांवर काही व्यापारी गाळे आहेत. त्या गाळेधारकांनी कारवाईला विरोध केला. त्यांना प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.
महसूल विभागाचे पथक प्रमुख योगेश नन्नवरे, तलाठी राजू वंजारी, राहुल अहिरे हे गाळे सिल करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना या दुकानदारांनी विरोध केला. त्यावेळी तेथे नायब तहसीलदार चंदनकर आणि पोलीसदेखील आले. त्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे घटना स्थळी पोहचल्या. त्यांनी या भूखंड धारकांना नजराणा रक्कम भरण्याबाबत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. या प्रकरणात ४० प्लॉटधारकांना ३ कोटींचा नजराणा भरण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.
फोटो १९ सीटीआर ४१