सिनेस्टाईल पाठलाग करून सव्वा लाखाचा डिंक जप्त
By admin | Published: March 26, 2017 11:54 PM2017-03-26T23:54:45+5:302017-03-26T23:54:45+5:30
चोपडा : डिंक तस्करांनी वनकर्मचा:यांना चाकूचा धाक दाखवला, वाहन अंगावर घालण्याचा प्रय}, फरार होण्यात तस्कर यशस्वी
चोपडा : डिंकाची तस्करी करणा:यांना वनविभागाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. आरोपींकडून 1 लाख 14 हजार रूपये किंमतीचा 380 किलो डिंक व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले पण आरोपी फरार झाले. तस्करांनी वन कर्मचा:यांना चाकू दाखवून अंगावर वाहन घालण्याचा प्रय} केला. हा पाठशिवणीचा खेळ 24रोजी रात्री 9 ते पहाटे तीन वाजेर्पयत सुरू होता.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 रोजी सहायक वनसंरक्षक पी.आर. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडय़ाकडून वैजापूरमार्गे डिंक मध्य प्रदेशात नेला जात असल्याची माहिती मिळाली.
आरोपींना पकडण्यासाठी कर्जाणे व वैजापूर वनविभागाच्या कर्मचा:यांचे पथक तयार करण्यात आले. वैजापूरचे वनक्षेत्रपाल एम.बी. पाटील व कर्जाणा वनक्षेत्रपाल अशोक साळुंखे व कर्मचारी यांच्या संयक्त पथकाने मिळून सापळा रचला. रात्री 9.30 वाजता चोपडा येथून चारचाकी वाहनाचा (क्र. एमपी 09-व्ही 7350) पाठलाग सुरू केला.
चाकूचा धाक दाखवला.
त्या चारचाकीत अवैध डिंक असल्याची खात्री झाली. चोपडय़ापासून 13 किलोमीटरवर असलेल्या बोरअजंटी गावाजवळ वनविभागाचा तपासणी नाका आहे. तेथील कर्मचा:यांनी दांडा आडवा करत चारचाकी अडविण्याचा प्रय} केला. मात्र तेथील कर्मचा:यांना चाकूचा धाक दाखवून चोरटे तेथून पसार झाले.
अंगावर घातली गाडी
बोरअजंटीपासून 8 किलोमीटर अंतरावरील वैजापूरजवळ तेथील कर्मचा:यांनी गाडी थांबवण्याचा प्रय} केला. तेथून भरधाव वेगाने ते कर्जाणाकडे वळले. कर्जाणा येथील कर्मचारी देवङिारीकडे जाणारा रस्ता अडवून उभे राहिले. त्या कर्मचा:यांच्या अंगावर या तस्करांनी गाडी घातली. डिंक तस्करांनी गावाबाहेरील कर्जाणा आश्रमशाळेकडून अनेर नदीकडे जाणा:या कच्च्या रस्त्यावर गाडी टाकली.
अनेर नदीत गाडी टाकून पसार होण्याचा प्रय} केला. रात्री 10.30 च्या सुमारास अनेर नदी पार करताना डिंक भरलेली चारचाकी नदीच्या खडकात अडकली. त्याचवेळी मागावर असलेले वनकर्मचारी आरोपींच्या गाडीजवळ येऊन धडकले. हे पाहून चारचाकीचा चालक तेथून फरार झाला. त्या गाडीतील डिंक बाहेर काढत, कर्मचा:यांनी चारचाकी बाहेर काढण्यासाठी कर्जाणा येथून ट्रॅक्टर मागवले. नेमका त्याचवेळी मध्य प्रदेशातून 40 ते 50 जणांचा जमाव आला. त्या जमावाचा सामना आठ ते दहा कर्मचारी करू शकत नसल्याने देवङिारी जंगलातील एसआरपीच्या जवानांना बोलाविण्यात आले. त्या चोरटय़ांच्या समर्थकांनी चारचाकी उचलून बाजूला काढत मध्य प्रदेशात धूम ठोकली.
वन गुन्हा दाखल
या वाहनात 380 किलो डिंक सापडला. त्याची बाजारभावाने किंमत 1 लाख 14 हजार आहे. याबाबत कर्जाणे येथे अज्ञात चोरटय़ांविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला.
(वार्ताहर)
रात्री चारचाकी काढण्यासाठी चोरटय़ांनी ट्रॅक्टर (क्र. एमपी 46 -ए 1470) मागविले होते. परंतु ट्रॅक्टरचे डिङोल संपल्याने ते तेथेच थांबले. सकाळी पाच वाजता मुद्देमालासह चोरटय़ांचे ट्रॅक्टर वनविभागाने ताब्यात घेतले .
4 आरोपींनी वनविभागाच्या कर्मचा:यांना धाक दाखविण्यासाठी वाटेल ते प्रकार केले. मात्र वनकर्मचारी मागे हटले नाही. त्यांनी डिंक जप्त केलाच. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई सहायक वनसंरक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जाणे वनक्षेत्रपाल संजय साळुंके, वैजापूर वनक्षेत्रपाल एम. बी. पाटील, वनपाल ए.पी. पाटील, वनरक्षक उल्हास पाटील, आर.बी. पवार, पी.के. शिंदे व वनमजूर यांच्या संयुक्त पथकाने केली.