सात लाख रुपयांचा अपहार उघड
By admin | Published: March 18, 2017 12:19 AM2017-03-18T00:19:03+5:302017-03-18T00:19:03+5:30
बोदवड तालुक्यातील भारत निर्माण योजना : येवती येथील सरपंचांसह ग्रामसेवकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
बोदवड : तालुक्यातील येवती ग्रामपंचायतीत भारत निर्माणीच्या पाणीपुरवठा योजनेत सात लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
या मोठय़ा अपहारात येवती येथील विद्यमान सरपंच व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम देवराम पाटील यांच्यासह ग्रामसेवक व माजी सरपंचावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे.
माजी सरपंच यशोदाबाई रघुनाथ जंजाळ यांच्या कार्यकाळात येवती येथील भारत निर्माण योजनेत अपहार करून शासनाची फसवणूक करून सुमारे सात लाखांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे येवती येथील निवृत्ती किसन वाघ यांनी केलेल्या तक्रारीत उघडकीस आले होते. त्यात तत्कालीन सरपंच आरोपी यशोदाबाई जंजाळ, विद्यमान सरपंच पुरुषोत्तम पाटील, तत्कालीन ग्रामसेवक संजय आधार कुमावत, ग्रामसेवक विश्वनाथ प्रल्हाद तायडे यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचे नमूद करीत 17 मार्च रोजी बोदवड पोलीस ठाण्यात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र सपकाळे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं.10/2017 भाग 5 भादंवि कलम 420, 467, 468, 471, 409, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत सरपंच पुरुषोत्तम पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
यांचा आहे आरोपींमध्ये समावेश..
4तत्कालीन सरपंच आरोपी यशोदाबाई जंजाळ, विद्यमान सरपंच पुरुषोत्तम पाटील, तत्कालीन ग्रामसेवक संजय आधार कुमावत, तत्कालीन ग्रामसेवक विश्वनाथ प्रल्हाद तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बोदवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भारत निर्माण योजनेतील अपहार
माजी सरपंच यशोदाबाई रघुनाथ जंजाळ यांच्या कार्यकाळात येवती येथील भारत निर्माण योजनेत अपहार करून शासनाची फसवणूक करून सुमारे सात लाखांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे येवती येथील निवृत्ती किसन वाघ यांनी केलेल्या तक्रारीत उघडकीस आले होते.
पोलिसांचा तपास सुरू
येवती येथील ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल होताच येवती गावात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली. पोलिसांनी फिर्याद दाखल होताच गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींना अटक करण्याची कारवाई पोलीस करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.