जळगावात सात लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 08:08 PM2018-08-31T20:08:20+5:302018-08-31T20:09:42+5:30
चोपडा मार्केट परिसरात असलेल्या गोदामातून शुक्रवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनातर्फे सहा लाख ९३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
जळगाव : चोपडा मार्केट परिसरात असलेल्या गोदामातून शुक्रवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनातर्फे सहा लाख ९३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
बंदी असलेला गुटखा शहरात साठविला असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास मिळाल्यानंतर प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) वाय.के.बेंडकुळे, अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, अनिल गुजर, विवेक पाटील हे चोपडा मार्केटमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास मे.संतोष ट्रेडर्सच्या गोदामात पोहचले. गोदामाची तपासणी केली असता त्या ठिकाणी गुटख्याचे तीन हजार पाकिटे व तंबाखुचे चार हजार पाकिटे असा एकूण सहा लाख ९३ हजाराचा साठा आढळून आला. भूषण तांबे यांच्याकडून हा साठा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.