जळगाव जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे सात सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:44 PM2020-02-12T12:44:44+5:302020-02-12T12:45:15+5:30

जात प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई

Seven members of the four gram panchayats in Jalgaon district are ineligible | जळगाव जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे सात सदस्य अपात्र

जळगाव जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे सात सदस्य अपात्र

Next

जळगाव : निवडणुकीनंतर दिलेल्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या पाच ग्रामपंचायचींच्या अकरा सदस्यांवर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्यानंतर मंगळवारी पुन्हा चार ग्रामपंचायतींच्या सात सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. यामध्ये चाळीसगाव, मुक्ताईनगर, जामनेर व एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा समावेश आहे.
जामनेर तालुक्यातील मोरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या गिरीजाबाई राठोड यांनी २०१८ मध्ये राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. मात्र जातीचे प्रमाणपत्र सादर केले नव्हते. या प्रकरणी हिरालाल राठोड यांनी यांनी जिल्हाधिकाºयांकडे ११ जुलै २०१९ रोजी तक्रार केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊन, जिल्हाधिकाºयांनी गिरीजाबाई राठोड यांना अपात्र घोषित केले आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील शेमदडे ग्रामपंचायतीच्या सदस्या संगीता कोळी यांनी २०१५ मध्ये महिला राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. परंतु, जात प्रमाणपत्र सादर न केल्याबाबत २६ आॅगस्ट २०१९ रोजी विनोद चोपडे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवर जिल्हाधिकाºयांनी सुनावणी घेऊन संगीता कोळी यांना अपात्र ठरविले. चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे ग्रामपंचायतीच्या सदस्या मीना सोनवणे व अनिल पवार यांनी २०१८ मध्ये निवडणूक लढविली होती. मात्र, जात प्रमाणपत्र सादर न केल्याबद्दल नंदकिशोर पाटील यांनी मार्च २०१९ मध्ये जिल्हाधिकाºयांकडे तक्रार अर्ज दाखल केला होती. यावर आज सुनावणी झाली. यामध्ये अनिल बंकट पवार यांनी विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टळली तर मीना सोनवणे यांनी मात्र मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी अधिकारी अ‍ॅड. हरुल देवरे यांनी दिली.
एकाच ग्रामपंंचायतीचे चार सदस्य अपात्र
एरंडोल तालुक्यातील विखरण ग्रामपंचायतीचे सदस्य योगराज बळीराम महाजन, किरण हिरामण महाजन, बापू भिखा इंगळे व माधुरी मनोहर ठाकूर यांनी २०१८ मध्ये निवडणूक लढविली होती. मात्र, निवडणुकीनंतर दिलेल्या मुदतीत अर्ज सादर न केल्याने, ओंकार कृष्णा पाटील यांनी २७ आॅगस्ट २०१९ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीवर मंगळवारी सुनावणी होऊन, जिल्हाधिकाºयांनी या चारही सदस्यांना अपात्र घोषित केले आहे.

Web Title: Seven members of the four gram panchayats in Jalgaon district are ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव