सात रेशन दुकानांचे परवाने रद्द
By admin | Published: January 19, 2016 01:09 AM2016-01-19T01:09:20+5:302016-01-19T01:09:20+5:30
धुळे : जिल्ह्यातील सात स्वस्त धान्य (रेशन) दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत,
धुळे : जिल्ह्यातील सात स्वस्त धान्य (रेशन) दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर नऊ दुकानचालकांना सक्त ताकीद देऊन त्यांच्याकडून शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आह़े ग्रामस्थांच्या तक्रारी, तसेच विविध त्रुटी आढळून आल्याने जिल्हा पुरवठा विभागाने ही कारवाई केली आह़े जिल्ह्यात एक हजारावर स्वस्त धान्य दुकाने आहेत़, तर 11 लाख 66 हजार 322 कार्डधारक नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेत सहभागी करण्यात आले आह़े त्यात अंत्योदय लाभार्थी 76 हजार 409, तर प्राधान्य कुटुंब योजनेचे 10 लाख 99 हजार 912 लाभार्थी आहेत़ दरम्यान, स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थीना गहू, तांदूळ व साखर देण्यात येत़े मात्र जिल्ह्यात अनेक रेशन दुकाने बंद असतात. उघडलीच तर अजून धान्य आले नाही, ते आल्यावर या, गहू संपला आहे, तांदूळ घेऊन जा, आता धान्य संपले आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दुकानदार देतात़ तर काही दुकानदार धान्य काळ्याबाजारात विक्री करतात़ तसेच दुकानाबाहेर धान्य किती आले आहे याचा फलक नसतो, धान्याचे नमुने काचेच्या बाटलीत ठेवलेले नसतात, किमतीपेक्षा जास्त पैसे घेणे, माल दिल्यानंतर ग्राहकाला रीतसर त्याची पावती न देणे, दिलीच तर कच्ची किंवा बनावट पावती देणे, अशा अनेक तक्रारी ग्रामस्थ पुरवठा विभागाकडे करतात़ त्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी त्या दुकानाची तपासणी करतात़ त्यांचे रजिस्टर तपासतात़ त्यानंतर चौकशीअंती जिल्हा पुरवठा अधिकारी दुकानाचे परवाने रद्द करतात, तर काहींना सक्त ताकीद देऊन त्यांच्याकडून अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात येत़े. दरम्यान, जानेवारीमध्ये पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सात दुकानांचे परवाने रद्द करून त्यांची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त केली आह़े, तर नऊ दुकानांना सक्त ताकीद देऊन त्यांची शंभर टक्के अनामत रक्कत जप्त करण्यात आली आह़े यांचे परवाने रद्द दुकान क्रमांक 144 रेशन दुकानदार शबरी माता महिला बचत गट, रुदाणे (ता़ शिंदखेडा), दुकान क्ऱ 199 सावित्रीबाई महिला बचत गट, खंबाळे (ता़ शिरपूर), दुकान क्ऱ 136 शकुंतलाबाई पाकळे, लामकानी (ता़ धुळे), दुकान क्ऱ 48 मीनाबाई सोनार लामकानी (ता़ धुळे), दुकान क्ऱ 53 निर्मलाबाई गांगुर्डे, देगाव (ता़ साक्री) तसेच दुकान क्ऱ 177 तुफानीबाई पावरा, भोईटी (ता़ शिरपूर), दुकान क्ऱ 133 धनदाई महिला बचत गट, हुंबर्डे (ता़ शिंदखेडा) या दुकानांचे प्राधिकारपत्र (परवाना) रद्द करण्यात आले आहे व त्यांच्याकडून शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आह़े 9 दुकानदारांना सक्त ताकीद दुकान क्ऱ 18 चेतना महिला बचत गट डांगुर्णे (ता़ शिंदखेडा), दुकान क्ऱ 22 कल्पना पाटील, बाळापूर (ता़ धुळे), दुकान क्ऱ 85 तुकाराम माळी, भदाणे (ता़ धुळे), दुकान क्ऱ 159 एम़क़े पावरा, पळासनेर (ता़ शिरपूर), दुकान क्ऱ 96 चमारू गावीत, शेंदवड (ता़ साक्री) तसेच धुळे शहरातील दुकान क्ऱ 80 विजया शेळके, साने गुरुजी कॉलनी, दुकान क्ऱ 65 विकास कार्यकारी सोसायटी, मोहाडी उपनगर, दुकान क्ऱ 24 अलका चौधरी व दुकान क्ऱ 89 शिवाजी वाये, मोहाडी उपनगर या रेशन दुकानदारांना सक्त ताकीद देऊन त्यांची शंभर टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आह़े