आमदार चव्हाणांमार्फत चाळीसगावसाठी सात अत्याधुनिक औषध फवारणी यंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 07:23 PM2020-03-30T19:23:27+5:302020-03-30T19:24:55+5:30
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन काम करत असताना आमदार मंगेश चव्हाण व भाजप पदाधिकाऱ्यांनीदेखील कंबर कसली आहे.
चाळीसगाव : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन काम करत असताना आमदार मंगेश चव्हाण व भाजप पदाधिकाऱ्यांनीदेखील कंबर कसली आहे. विविध माध्यमातून ते यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या जनसेवा कार्यालयात गरजू रुग्णांसाठी मोफत दवाखाना, दररोज १५०० गरजू नागरिकांना घरपोच अन्नसेवा, ग्रामीण भागात १५० गावांना सोडियम हायपोक्लोराईड ची औषधी देण्यात येत आहे. त्यानंतर सोमवारीआमदार चव्हाण यांनी सात अत्याधुनिक फवारणी यंत्र चाळीसगाव शहरासाठी आपल्या शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. सदर फवारणी यंत्रे ही छोट्या ट्रॅकटरला जोडून कार्यान्वित केली जात असून त्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निजंर्तुकीकरण करण्यासाठी उपयुक्त असलेले सोडियम हायपोक्लोराईड औषध वापरले जात आहे.
पालिकेच्या अग्निशमन केंद्रात या सर्व फवारणी यंत्रांची सुरुवात आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रॅकटर चालवून फवारणी केली. यावेळी नगराध्यक्षा आशालताचव्हाण, भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजू चौधरी, गटनेते संजय पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, बाप्पू अहिरे, सोमसिंग राजपूत, मानसिंग राजपूत, चिरागोउद्दीन शेख, चंदू तायडे, विजया पवार, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा संगीता गवळी, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, अमोल चौधरी, इमरान शेख आदी उपस्थित होते.