अँटिजन चाचणी शिबिरात सात जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:22+5:302021-05-10T04:16:22+5:30
कोरोना खबरदारी : शिवसेना व रेडक्रॉस सोसायटीतर्फे आयोजन जळगाव : शिवसेना महानगर व इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे रविवारी ...
कोरोना खबरदारी : शिवसेना व रेडक्रॉस सोसायटीतर्फे आयोजन
जळगाव : शिवसेना महानगर व इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे रविवारी तुकारामवाडी-गणेशवाडी परिसरात घेण्यात आलेल्या कोरोना अँटिजन चाचणी शिबिरात २८४ नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात ७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी उपाध्यक्ष गनी मेमन, विनोद बियाणी, नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बर्डे, अनंत जोशी, मनोज चौधरी, गणेश सोनवणे, जितेंद्र छाजेड, प्रशांत सुरळकर, जयेश ढाके उपस्थित होते.
ज्या नागरिकांना ‘कोरोना’ची सौम्य लक्षणे जाणवत होती, त्यांनीही अँटिजन टेस्ट करून घेतली. या शिबिराला डॉ. प्रमोद खिंवसरा यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, गोकुळ बारी, उमाकांत जाधव, अर्जुन भारुळे, पीयूष हसवाल, राहुल चव्हाण, पीयूष तिवारी, दीपक धनजे, अश्फाक शेख, राहुल ठाकरे, गणेश भोई, अरुण गोसावी यांनी परिश्रम घेतले.
बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात
जळगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे बलदेव उपाध्याय यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. बलदेव उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात झाली.
शिबिराला आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी भेट दिली. यावेळी रेडक्रॉसचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक श्रीकांत खटोड, अध्यक्ष अशोक वाघ, मोहन तिवारी, गोपाल पंडित, किसन अबोटी, शिवप्रसाद शर्मा, सुरेंद्र मिश्रा, संजय व्यास, राधेश्याम व्यास, विश्वनाथ जोशी, महेंद्र पुरोहित, दिनकर जेऊरकर, कमलाकर फडणीस, डॉ.नीलेश राव, आमला पाठक, मानिनी तपकिरे, छाया व्यास, भाग्यश्री राव, पीयूष रावळ, राहुल कुळकर्णी, भूषण भंडारी, संग्राम जेहुरकर,निरंजन कुळकर्णी, डॉ. महेंद्र जोशी, दीपक साखरे, पंकज पवणीकर, दिलीप सिखवाल, दीपक कुलकर्णी, चंद्रकांत पाठक, प्रसाद पटवे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.