भुसावळ तालुक्यात सात हजार लोकांनी अ‍ॅपवर नोंदवली मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:51 AM2018-08-27T00:51:22+5:302018-08-27T00:55:16+5:30

भुसावळ तालुक्यात सुरू झालेल्या ग्राम स्वच्छता अभियानात सुमारे ७ हजार गावकऱ्यांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली आहेत.

 Seven thousand people in Bhusawal taluka recorded the app | भुसावळ तालुक्यात सात हजार लोकांनी अ‍ॅपवर नोंदवली मते

भुसावळ तालुक्यात सात हजार लोकांनी अ‍ॅपवर नोंदवली मते

Next
ठळक मुद्दे१ आॅगस्टपासून सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

भुसावळ जि. जळगाव : स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ यामध्ये प्रशासनाने केलेल्या अथक परिश्रमाने शनिवारी पहिल्याच दिवशी तालुक्यात ६ हजार ९०५ लोकांनी आपली मते अ‍ॅपवर नोंदवली. ही मतनोंदणी १ आॅगस्ट पासून सुरू झाली असून ३१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.
'स्वच्छ ग्राम स्वच्छ जिल्हा' या योजनेंअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा उपक्रम केंद्र शासनाच्या माध्यमातून पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयातर्फे संपूर्ण देशभरात सुरू आहे. गेल्या १ आॅगस्टपासून हे सर्वेक्षण सुरू झाले असून ३१ आॅगस्टपर्यंत ते चालणार आहे.
या सर्वेक्षणातून जिल्हा व राज्यांना रँक तथा क्रमवारी दिली जाणार आहे. त्यासाठी अँड्राईड मोबाईलमध्ये एसएसजी २०१८ हे अ‍ॅप डाऊनलोड करायचे असून त्यात विचारलेल्या ८ प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. अभियानाची माहिती, गावातील स्वच्छतेची सुधारणा, घनकचरा विल्हेवाट, ओल्या कचºयाची विल्हेवाट, वय, लिंग, शिक्षण व व्यवसाय अशा प्रश्नांची उत्तरे आपल्या गावासंदर्भात द्यायची असून त्यासाठी पर्याय दिलेले आहेत.
तालुक्यात मोहीम सुरू
या संदर्भातील अधिक जनजागृती मोहिमेस जि. प .चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार भुसावळ तालुक्यात प्रारंभ झाला आहे. तीन दिवशीय ही जागृती मोहीम असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, ग्रामीण वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी अशा कर्मचाºयांनी गावागावात जाऊन जनजागृती केली आणि अ‍ॅप डाऊनलोड करून मतनोंदणी करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, नियुक्त केलेल्या या कर्मचाºयांना तब्बल १२ तास तालुक्यातील गावात घरोघरी फिरावे लागले.

 

Web Title:  Seven thousand people in Bhusawal taluka recorded the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.