सातपुडय़ातील केळी निघाली अरब राष्ट्रात
By admin | Published: March 28, 2017 02:09 PM2017-03-28T14:09:01+5:302017-03-28T14:09:01+5:30
सातपुडय़ातील सुलवाडा, कुढावद व परिसरातील शेतक:यांनी उत्पादित केलेली केळी सध्या सौदी अरबमध्ये निर्यात करण्यात येत आहे.
Next
>रमाकांत पाटील
नंदुरबार, दि.28- प्रतिकुल परिस्थितीमुळे शेती व्यवसायच धोक्यात आल्याचा सूर सर्वत्र व्यक्त होत असतांना शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी परिसरातील शेतक:यांनी कष्ट, चिकाटी आणि नव्या तंत्रज्ञानाचा वेध घेत अखेर आपला उत्पादीत केलेला माल सातासमुद्रापार पाठवून नव्या उमेदीच्या शेतक:यांपुढे नवा आदर्श उभा केला आहे. या भागातील केळी सध्या सौदी अरब मध्ये निर्यात होत असून त्यामुळे केळी उत्पादक शेतक:यांच्या आनंद द्विगुणीत झाला आहे.
शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी, सुलवाडा, कुढावद या गावांमध्ये केळीची मोठय़ा प्रमाणावर लागवड होते. गेल्या वर्षानुर्षापासून केळीची विक्री स्थानिक स्तरावर जळगाव, रावेरच्या भावानुसार पारंपारिक पद्धतीने होत आहे. या भागातील केळी उत्तम दर्जाची असल्याने ती विदेशात एक्सपोर्ट व्हावी यासाठी या भागातील प्रगतशील शेतकरी कै.नरोत्तम मंगेश पाटील यांचे प्रयत्न होते. त्यांच्याच प्रयत्नानुसार गेल्यावर्षी कोल्हापूर येथील एका संस्थेशी करार करून त्यांनी आपल्या परिसरातील शेतक:यांना प्रवृत्त करून त्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 300 एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. या केळीचे उत्पन्न सध्या सुरू झाले असून संबधीत संस्थेतर्फे ती कराराप्रमाणे खरेदी करून अरब राष्ट्रात पाठविली जात आहे. गेल्या आठवडा भरात जवळपास 800 क्विंटलपेक्षा अधीक केळी ही अरब राष्ट्रातील देशांमध्ये पाठविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील शेतक:यांमध्ये हा एक कुतूहलाचा विषय असून शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अशी होते एक्सपोर्ट
कोल्हापूर येथील संस्थेच्या मार्गदर्शनाखाली खास एक्सपोर्ट करण्यासाठी ब्राम्हणपुरी, सुलवाडा परिसरातील जवळपास 40 हून अधीक शेतक:यांनी 300 एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. टिश्यू पद्धतीने ही केळी लागवड झाली असून अवघ्या 11 महिन्यात त्याचे उत्पादन सुरू झाले आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाप्रमाणे औषधांची फवारणी, खतांचा मात्रा, मशागत व इतर कामे राबविल्याने या केळीचा दर्जा अतिशय उत्तम आहे. केळीचे पोषणही उत्तम पद्धतीने झाल्याने एका घडाचे वजन जवळपास 28 ते 30 किलोर्पयत सरासरी येत आहे. त्याला भाव देखील रावेरच्या भावापेक्षा प्रतिक्विंटल 250 रुपये जास्त मिळत आहे. सध्या या केळीची खरेदी 1700 रुपये क्विंटलप्रमाणे होत आहे.
ही केळी थेट एक्सपोर्ट होत असल्याने त्याची पॅकींगही उत्तम दर्जाची होत आहे. केळीचा घड कापल्यानंतर त्याच्या प्रत्येक फणी रासायनिक द्रव्यात भिजवून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले जात आहे. त्या पिशव्यांमधील हवा व्हॅक्यूम क्लिनगरद्वारे काढून बॉक्समध्ये त्याची पॅकींग होत आहे. या बॉक्सचा भरलेला कंटेनर थेट मुंबईला रवाना होत असून तेथून सौदी अरबला जात आहे.