केळीवर तीव्र उन्हाचा प्रकोप
By admin | Published: April 18, 2017 12:38 AM2017-04-18T00:38:03+5:302017-04-18T00:38:03+5:30
रावेर : प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल
रावेर : केळीच्या माहेरघरातच ग्लोबल वॉर्मिगचे पडसाद म्हणून की काय एप्रिलच्या मध्यातच मे हिट सारख्यच 47 डिग्रीच्या असह्य सनस्ट्रोकने केळीला माहेरात पोरकं करून सोडले आहे. प्रतिकूल, असह्य तापमानात केळीची खोडं खाली जमिीवर पडत आहेत. तर फळारूपाला येणारा वा परिपक्व झालेली केळीची घडं निसटून उत्पादकांची अपरिमित हानी सुरू झाली आहे.
सनस्ट्रोकच्या शॉकचे विपरीत परिणाम तत्क्षणीच दिसणारे नसून कालांतराने केळीबाग उद्ध्वस्त झाल्याचे दृष्टिक्षेपात पडत असल्याने शासनाच्या कृषी विभागाने फळपीक विमा कंपनीला यासंदर्भात पाठपुरावा करून केळी उत्पादकांना त्यांच्या न्यायहक्काचा संरक्षित विमा मिळून देण्यात न्यायाची भूमिका बजवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकीकडे निर्यातक्षम केळी उत्पादनाचे गोडवे गायिले जात असताना, एखाद्या गारपिटीच्या तडाख्यालाही लाजवावा असा हा एप्रिल महिन्यांच्या मध्यातील सनस्ट्रोकचा तब्बल 47 सेल्सीअंश डिग्रीच्या तापमानाचा आकाश फाडून केळीला दिला जाणार तडाखा केळी उत्पादकांना ठिगळ लावण्यासाठी दुरापास्त ठरल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंताक्रांत झाला आहे.
चैत्रातच वैशाख वणवा पेटवणारी आग सूर्य मार्च महिन्यांनंतरही आता एप्रिलच्या मध्यातच ओकू लागला आहे. केळीला प्रतिकूल ठरणा:या 47 सेल्सिअस डिग्री तापमानाची उष्णलहर कालपासून निर्माण झाल्याने केळीच्या माहेरातच बसणारे चटके केळीची प्रचंड हानी करणारे ठरले आहेत. केळीमालाची बेभावाने होणारी विक्री पाहता नवती केळीचे क्षेत्र साडेअकरा हजार हेक्टर्पयत येऊन ठेपले आहे. साडेनऊ हजार हेक्टरमधील जुनारी आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
त्या तरी कांदालागवडीतून होणा:या बागांमध्ये अतिउष्ण वा अतिथंड तापमान सहन करण्याची जी सहनशक्ती असते ती मात्र ऊतीसंवंर्धीत केळीबागांमध्ये राहत नसल्याने ऊतीसंवंर्धीत केळीबागांचे या प्रतिकूल तापमानात मोठय़ा प्रमाणात नुकसान आहे होत असल्याचे चित्र आहे.
केळीला किमान 40 सेल्सिअस तापमानाची कमाल मर्यादा आहेत. मात्र, एप्रिलच्या मध्यातच सुरू झालेल्या या प्रतिकूल 47 सेल्सिअस तापमानामुळे केळी बागांची कमालीची अपरिमित हानी होणार आहे.
ऊतीसंवंर्धीत केळीसह काही महालक्ष्मी वाणाचे केळीबागांचे घड निसटून पडणे, अपरिपक्व अवस्थेतच केळीचे खोड खाली पडून अध्यार्तून तुटून पडणे वा थेट मुळांची खोड उखडून पडणे असे दुष्परिणाम सनस्ट्रोकच्या तडाख्यात दिसून येत आहेत.
त्यामुळे लागवडीपासून ते खोड फळारूपाला येईपावेतो एखाद्या नवजात शिशुप्रमाणे केळीखोडांची काळजी घेतली तरी या अस्मानी व सुल्तानी संकटामुळे केळी उत्पादक संकटात सापडला आहे.
त्या अनुषंगाने केळी फळपीक विमा योजनेंतर्गत तापमानाच्या निकषाधारे शासनाच्या कृषी विभागाने संबंधित फळपीक विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून निसर्गदत्त न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
(वार्ताहर)