पंधरवड्यापासून वावडे येथे तीव्र पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:33 AM2019-02-05T00:33:11+5:302019-02-05T00:35:30+5:30

ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा विहीर आटल्याने अमळनेर तालुक्यातील वावडे येथे पंधरा दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

 Severe water scarcity at fortnight from Waavwade | पंधरवड्यापासून वावडे येथे तीव्र पाणी टंचाई

पंधरवड्यापासून वावडे येथे तीव्र पाणी टंचाई

Next
ठळक मुद्देपाणी पुरवठा करणारी विहीर आटल्याने गावावर संकट लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची मागणी

वावडे ता. अमळनेर : गावात गेल्या १५ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून पाणी समस्या दूर करण्याची मागणी केली जात आहे.
वावडे येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीवर गावाची पाण्याची तहान भागत असते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून विहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मांडळ येथून पाईपलाईन करून पाणी गावात आणले जाते, परंतु पांझरा नदीला पाणी नसल्यामुळे ती विहीर देखील आटली आहे. आणि गेल्या महिन्याभरापासून मांडळ येथून देखील पाणी येणे बंद झाले आहे. लोकप्रतिनिधींनी या समस्यकडे लक्ष द्यावे व अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यास प्रशासनास सूचना करावी अशी मागणी होत आहे.
विशेष म्हणजे अमळनेर पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भील यांचे वावडे हे माहेर आहे. जिल्हा परिषद सदस्या संगिता भील, व सरपंच राजेंद्र भील यांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

Web Title:  Severe water scarcity at fortnight from Waavwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.