शाहूनगरातील कच्ची चाळ भागातील घरात शिरले गटारीतील पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:17 AM2021-05-19T04:17:00+5:302021-05-19T04:17:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- शाहूनगर परिसरातील इंदिरानगर भागातील कच्ची चाळ परिसरातील गटार तुंबल्याने त्यामुळे परिसरातील घरांमध्ये गटारीचे पाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- शाहूनगर परिसरातील इंदिरानगर भागातील कच्ची चाळ परिसरातील गटार तुंबल्याने त्यामुळे परिसरातील घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याचा प्रकार घडला. महापौर जयश्री सुनिल महाजन यांना या भागातून आपल्या गाडीतून जाताना पाहावयास मिळाले. त्यांनी तत्काळ गाडीतून उतरून या प्रकाराबाबत उपस्थितांशी चौकशी करत, तात्काळ गटारीवर कल्व्हर्टर टाकण्याचा सूचना महापौरांनी मनपा उपायुक्तांना दिले आहेत. आरोग्य विभागाचे उपायुक्त पवन पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेतले. शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोलेंशी संपर्क करून संबंधित गटार संपूर्णपणे साफ करण्यासह त्यावर नव्याने स्लॅब कल्व्हर्ट बसविण्याच्या कामाचे प्राधान्याने इस्टिमेट तयार करून त्याची वर्कऑर्डर काढून हे काम आठ दिवसांत पूर्ण व्हावे व संबंधित गटार प्रवाही करावी, असे आदेश दिले.