रोटरी वेस्टतर्फे शिलाई मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:37+5:302021-05-23T04:15:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आगीमध्ये टेलरिंग दुकान जळून खाक झाल्यानंतर संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आगीमध्ये टेलरिंग दुकान जळून खाक झाल्यानंतर संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे आगग्रस्त संजय सोनवणे यांना शिलाई मशीन भेट देण्यात आली.
रामेश्वर कॉलनी, मेहरुण येथील टेलरिंगचा व्यवसाय करणारे संजय सोनवणे यांचे दुकान आठ दिवसांपूर्वी आगीत भस्म झाले. यात त्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले व त्यांचा पूर्ण व्यवसाय बंद झाला होता. त्यांना मदत म्हणून अत्याधुनिक शिलाई मशीन रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे घेऊन देण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष तुषार चित्ते, सचिव केकल पटेल, सहप्रांतपाल योगेश भोळे, प्रकल्पप्रमुख सरिता खाचणे, कोषाध्यक्ष विवेक काबरा, सुनील सुखवानी, महेश सोनी, दिग्विजय पाटील, गौरव सफळे, देवेश कोठारी, शंतनू अग्रवाल हे उपस्थित होते.