शाह छप्परबंद मुस्लीम समाजाला विमुक्त जातीचे दाखले लवकर द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:13 AM2021-06-25T04:13:01+5:302021-06-25T04:13:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : भारतीय शाह छप्परबंद मुस्लीम समाज सुधारक मंडळाची जिल्हास्तरीय बैठक बुधवारी येथे झाली. जिल्हाध्यक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : भारतीय शाह छप्परबंद मुस्लीम समाज सुधारक मंडळाची जिल्हास्तरीय बैठक बुधवारी येथे झाली. जिल्हाध्यक्ष जाफरअली शाह यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा उपाध्यक्ष अशरफअली शाह यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यात शाह छप्परबंद मुस्लीम समाजाबद्दल चर्चा झाली. भुसावळ तालुक्यात शाह छप्परबंद मुस्लीम समाजातील लोकांना विमुक्त जातीचे दाखले लवकर द्यावे आणि येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच जिल्हा विभागीय जात पडताळणी समितीने शाह छप्परबंद मुस्लीम समाजातील मुलांच्या भवितव्याचा प्रश्न विचारताच पुढील अभ्यास करीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे.
यावेळी जिल्हाध्यक्ष जाफरअली शाह यांनी समाजाच्या सर्व लोकांना संपर्क साधण्याचे व संस्थेच्या माध्यमातून समाजातील लोकांचे प्रश्न सोडविण्यास सांगितले. शाह छप्परबंद मुस्लीम समाज लवकरच जिल्हा मतदारसंघात सामूहिक विवाहांचे नियोजन व आयोजन करण्याची चर्चा झाली. या कार्यासाठी संस्था संपूर्णपणे समाजातील लोकांसोबत आहेत. शाह समाजाला शासकीय व शैक्षणिक लाभ कसे द्यायचे, समाजातील लोकांना कसे जोडायचे, लग्नातील व्यर्थ खर्च कसा टाळायचा, इजतेमाईशी लग्न कसे करावे, अशा अनेक बाबींवर चर्चा झाली.
शाह समाजातील लोकांमध्ये सामील होण्याबरोबरच, कोणत्याही प्रकारच्या समस्या किंवा सूचनांसाठी मंडळाच्या जबाबदार व्यक्तींशी संपर्क साधू शकता.
बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष अशरफअली शाह, जिल्हा संघटक जाफर शाह, भुरा शाह, फारुक शाह, इशरत शाह, मजीद शाह, वजीर शाह, असगर शाह, अंसार शाह, शाह बॅटरीचे नाझिम शाह, फैसल शाह आणि भुसावळचे ग्रीन पार्कचे ठेकेदार हाजी अब्दुल रहीम शाह व बाबू अब्दुल रहीम शाह आणि शाह छप्परबंद मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.