शाहीर हरिभाऊ खैरनार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:04 PM2020-05-06T19:04:42+5:302020-05-06T19:04:57+5:30

जळगाव : पोवाड्यातून विविध सामाजिक संदेश देणारे तसेच खान्देशात शाहीरी कलेची बिजे रोवणारे एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील रहिवासी शाहीर हरिभाऊ ...

 Shahir Haribhau Khairnar passed away | शाहीर हरिभाऊ खैरनार यांचे निधन

शाहीर हरिभाऊ खैरनार यांचे निधन

googlenewsNext

जळगाव : पोवाड्यातून विविध सामाजिक संदेश देणारे तसेच खान्देशात शाहीरी कलेची बिजे रोवणारे एसएमआयटी महाविद्यालय परिसरातील रहिवासी शाहीर हरिभाऊ विठ्ठल खैरनार (८७) यांचे बुधवारी पहाटे ४़३० वाजता वृध्दपकाळाने निधन झाले़ घरात दु:खाचे वातावरण होते़ अंत्ययात्रेची तयारी सुरू होती़ त्यातच मोठ्या भावाची निधनाचा धक्का सहन न झाल्याने काही तासातच लहान बंधुचाही मृत्यू झाला़ केशव विठ्ठल खैरनार (८०, रा़ रामेश्वर कॉलनी) असे मयत लहान बंधुचे नाव आहे़ एका पाठोपाठ घरातील जेष्ठ सदस्य निघून गेल्याने खैरनार कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़
शाहीर हरिभाऊ खैरनार हे शहरातील बळीराम पेठेतील जुने रहिवासी़ त्यांनी त्यांच्या शाहीरी कार्यायातून अनेक उल्लेखनिय कार्य केली़ तर शासनाच्या विविध जनजागृती मोहिमेतून त्यांनी राज्यभरात फिरून नागरिकांना सामाजिक संदेश दिला़ दरम्यान, त्यांच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले होते़ महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या अध्यक्ष पदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती़ मात्र, मागील वर्षापासून प्रकृती अभावी त्यांनी आपले कार्य थांबविले होते़ तसेच ते दुर्गादेवी मंदिराच्या नवरात्रोत्सव व कीर्तन कार्यक्रमात सक्रीय राहत होते़

पहाटे झाले निधन
जुने बळीराम पेठेतील रहिवासी शाहीर हरिभाऊ खैरनार हे काही वर्षापासून एसएमआयटी महाविद्यालयाजवळ राहण्यासाठी आले होते़ मात्र, बुधवारी पहाटे त्यांचा वृध्दपकाळाने मृत्यू झाला़ ही वार्ता ८० वर्षीय लहान बंधु यांनाही कळाली़ दरम्यान, रामेश्वर कॉलनीतील लहान बंधु केशव खैरनार यांचाही काही तासानंतर मृत्यू झाला़ शाहीर हरिभाऊ यांच्या पश्चात मुलगा कैलास, सून, नातवंडे असा पवार आहे़ तर कैशव खैरनार यांच्या पश्चात मुलगा भुषण असा परिवार आहे़ कैशव खैरनार हे इंजिनिअर होते़ तसेच सीए डॉ़ रवींद्र खैरनार यांचे ते काका होते़

Web Title:  Shahir Haribhau Khairnar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.