निकाल राखीव ठेवल्या प्रकरणात चौकशीत शानबाग विद्यालय दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:50+5:302021-05-24T04:15:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फीसाठी निकाल राखून ठेवल्याच्या प्रकरणात चौकशीअंती अखेर कै. श्रीमती ब. गो. शानबाग विद्यालय दोषी ...

Shanbagh Vidyalaya convicted in reserved case | निकाल राखीव ठेवल्या प्रकरणात चौकशीत शानबाग विद्यालय दोषी

निकाल राखीव ठेवल्या प्रकरणात चौकशीत शानबाग विद्यालय दोषी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : फीसाठी निकाल राखून ठेवल्याच्या प्रकरणात चौकशीअंती अखेर कै. श्रीमती ब. गो. शानबाग विद्यालय दोषी असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी शिक्षणाधिकारी यांना दिला आहे. शाळेला सक्त ताकीद द्यावी, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांचा पाल्य प्रसाद शिंदे हा ८ वीत असून निकाल लागल्यानंतर त्यांना निकाल प्राप्त झाला नव्हता, अखेर याबाब त्यांनी शिक्षणािधकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षक व उपमुख्याध्यापकांच्या लेखी जबाबानुसार चौकशीअंति हा अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतर आता निकाल रोखून धरल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

कोट

विद्यालय प्रशासनाने खुलाशात सामाजिक जाणीवतेचा उल्लेख केला आहे; मात्र गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालांमुळे विद्यालय प्रशासन तोंडघसी पडले आहे. अशा संस्था निकाल राखीव ठेवत असतील तर इतरांनी काय करावे.

- रवींद्र शिंदे, तक्रारदार

सर्व शाळांना ताकीद

शहरातील व जिल्ह्यातील काही शाळांनी निकाल जाहीर करण्याच्या दिवशी निकाल न देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक व भावनिक पिळवणूक केलेली निदर्शनास आले असून कुणीही विद्याथ्र्यांचे निकला थांबवू नये, अशा सक्त सूचना शिक्षणािधकारी बी. जे. पाटील यांनी दिल्या आहेत. शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना पत्र देऊ्न सर्व माध्यमांच्या शाळांना सूचना देण्याचे सांगितले आहे.

Web Title: Shanbagh Vidyalaya convicted in reserved case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.