जळगावातील शनिपेठेत सट्टा अड्ड्यावर धाड, दहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:58 PM2018-07-27T12:58:08+5:302018-07-27T12:59:32+5:30
४६ हजाराची रोकड जप्त
जळगाव : शनिपेठेतील दत्त मंदिराच्या आडोशाला सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर गुरुवारी रात्री ८.३० वाजता परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी धाड टाकली. त्यात दहा सटोड्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४६ हजार ५०० रुपये रोख, सात मोबाईल व एक दुचाकी असा लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
यांना झाली अटक
रामदास निनाजी तायडे (वय ५४, रा.नागेश्वर कॉलनी), सतीश तुकाराम सपकाळे (वय ३०, रा, धामणगाव), रघुनाथ मोहन गजरे (वय २२, रा. कानळदा), आनंदा भिका सोनवणे (वय ४९, रा.खेडी), सखाराम भटू चौधरी (वय ६२, रा.कांचन नगर), सुरेश चिंधू पवार (वय ६८, रा. नाथवाडा), संजय झगा कोळी (वय ३३, रा.तानाजी मालुसरे नगर), बालन्ना लिंगन्ना गवळी (वय ५४, रा. गवळीवाडा), दिनेश श्रीराम गुर्दे (वय ३०, रा.रिधुरवाडा) व अमर पितांबर मरसाळे(वय ३८, रा.कांचन नगर) यांना अटक करण्यात आली आहे.
पाटील यांनी शनी पेठ पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, हेडकॉन्स्टेबल दिनेशसिंग पाटील, शीघ्र कृती दलाचे अनिल बडगुजर, तेजस मराठे, योगेश इधाटे, राहूल घेटे, अनिल गंबाळे व अभीजीत पाटील यांच्यासोबत गुरुवारी रात्री शनिपेठेतील दत्त मंदिराजवळ अचानक धाड टाकली.