शरद पवार १५ एप्रिलला जळगाव दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 10:08 AM2022-03-14T10:08:42+5:302022-03-14T10:09:00+5:30
या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १५ एप्रिल रोजी चांदसर ता. धरणगाव येथे दौऱ्यावर येणार आहेत. त्यात ते चांदसर येथे माजी आमदार स्व. मुरलीधर पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. १५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे,अविनाश आदिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक विकास पवार आणि जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली.