कोरोनामुळे दक्षता, गर्दी टाळण्यासाठी शरद पवार यांचा जळगाव दौरा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:37 PM2020-03-06T12:37:05+5:302020-03-06T12:37:31+5:30

जिल्हाध्यक्षाची माहिती

Sharad Pawar's Jalgaon tour canceled to avoid vigilance due to corona | कोरोनामुळे दक्षता, गर्दी टाळण्यासाठी शरद पवार यांचा जळगाव दौरा रद्द

कोरोनामुळे दक्षता, गर्दी टाळण्यासाठी शरद पवार यांचा जळगाव दौरा रद्द

Next

जळगाव : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून शक्यतोवर गर्दी टाळावी, अशा प्रशासकीय सूचना असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा ९ मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे़ याला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ रवींद्र पाटील यांनी दुजोरा दिला आहे़
अ‍ॅड़ पाटील व विकास पवार यांनी गुरूवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही माहिती दिली़
शरद पवार यांच्या उपस्थितीत शेंदुर्णी आणि चांदसर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ तसेच ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स झाली़ यात मुख्य सचिवांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले तशा सूचनाही स्थानिक पातळीवर दिल्यानंतर हा निर्णय झाल्याची माहिती आहे़
शरद पवार यांनी स्वत:हून गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती अ‍ॅड. पाटील यांनी दिली. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आगामी काळात या दौºयाचे नियोजन होईल, असे ते म्हणाले.

Web Title: Sharad Pawar's Jalgaon tour canceled to avoid vigilance due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव