अमळनेरात शारदीय व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:06 AM2019-09-29T00:06:31+5:302019-09-29T00:06:36+5:30
अमळनेर : मराठी वाङ्मय मंडळ व आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक वाचनालयातर्फे २९ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर दरम्यान शारदीय व्यख्यानमाला छत्रपती ...
अमळनेर : मराठी वाङ्मय मंडळ व आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक वाचनालयातर्फे २९ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर दरम्यान शारदीय व्यख्यानमाला छत्रपती शिवाजी नाट्यमंदिरात सायंकाळी साडे सहा वाजता आयोजित केली आहे.
२९ रोजी लेखक, दिग्दर्शक अशोक समेळ यांचे ‘मी एक चिरंजीवी अश्वथामा’, ३० रोजी कथाकथनकार विभा काळे यांचे ‘कथा विविधा’, १ आॅक्टोबर रोजी कवी अजीम नवाज राही यांचे ‘माझ्या मराठी कवितेची जडणघडण’, २ रोजी प्रा.अरविंद जगताप यांचे ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर ३ रोजी कीर्ती शिलेदार यांची ‘माझा शिलेदारी सांगीतिक नाट्यप्रवास’ या विषयावर औरंगाबाद येथील अश्विनी हिंगे प्रकट मुलाखत घेणार आहेत. उपस्थितीचे आवाहन मराठी वाङ्मय मंडळ व केले वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.