वाटा

By Admin | Published: June 18, 2017 04:22 PM2017-06-18T16:22:26+5:302017-06-18T16:22:26+5:30

वीकेण्ड स्पेशलमध्ये चंद्रकांत चव्हाण यांनी ललित या सदरात केलेले लिखाण.

Share | वाटा

वाटा

googlenewsNext

वाट हा एक लहानसाच शब्द. पण अर्थाच्या अनेक आयामांना सोबत करणारा. मनोविश्वात साकारणा:या प्रतिमांना प्रत्यक्षात आणण्यासाठी दूरवरच्या प्रदेशात नेण्यास निमित्त बनणा:या आणि आपल्यांना जवळ आणणा:यासुद्धा. वाटा केवळ वळत्या पावलांना दिशा देण्याचे साधन नसतात, तर जगण्याच्या प्रयोजनांना बळ देणा:याही असतात.

अंगावरील पाऊलखुणा मिरवित नागमोडी वळणे घेत पळणा:या पाऊलवाटेपासून चकचकीत देहकांती धारण करून धावणा:या महामार्गार्पयत प्रत्येक वाटेचं अंगभूत सौंदर्य असतं. वैभवाचा साज चढवून त्या चालत असतात. वेडय़ावाकडय़ा वळणांची सोबत करीत धरतीवर सांडलेल्या क्षितिजाला कवेत घेण्यासाठी पळत असतात. 
‘पाणंद’ नाव धारण करून माणसांच्या वस्तीतून हलकेच बाहेर पडणा:या पाऊलवाटेचा डौलच न्यारा. शिडशिडीत अंगकांतीला मिरवित ती चालत राहते. हिरवाई पांघरून डोलणा:या पिकांची सोबत करीत, झोकदार वळणे घेत अलगद पुढे सरकणा:या वाटा कधी कधी  अलवार बनतात. नववधूसारख्या लचकत, मुरडत चालतात. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरींनी भिजलेल्या वाटा सचैल स्नान करून आनंदतात, सुस्नात लावण्यवतीसारख्या. लुसलुसणा:या गवताच्या गालिच्यावरून अंथरलेल्या वाटांचा हिरवा रंग मनात साकोळलेल्या रंगांना गहिरेपणाची डुब देत राहतो. रिमङिामणा:या पावसाने ओलावून निसरडय़ा वाटा सौंदर्याने नटतात. मातीला मुलायमपणाचा स्पर्श घडून पावलांना बिलगणारे लोण्याचे गोळे गंधगार संवेदना बनून प्रकटतात.
चाको:या अंगावर गोंदून घेत वाट विस्तारत जाते. धावणा:या चाकांचा आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद गाणं बनून वळणं घेत पळणा:या वाटेला तरल भावनांचे सूर देतो. पावसात चिखल बनून लदलदलेल्या वाटा अंगावर ऊन ङोलीत शुष्क होत जातात आणि उन्हाळ्यात कोरडय़ाठाक होतात.  त्यावरील देखणे हिरवेपण हळूहळू हरवत जाते. एक उदासपण सोबत घेऊन आळसावलेल्या अंगाने पहुडलेल्या असतात. कोण्या चालत्या पावलांच्या आवाजाने जाग येऊन अंगावरील धूळ झटकीत हरवलेला आनंद शोधीत राहतात. कधी गुरावासरांच्या पावलांनी उडणारा धुळीचा गुलाल पश्चिम क्षितिजावर पडदा धरताना रंगवेडय़ा होतात. आकाश कवेत घेण्याकरिता उंच उडण्याचं स्वप्न पाहणा:या धुळीचा नकळत आनंदोत्सव होतो. 
वाटा कोटरात सुरक्षित आणून पोहोचवणा:या तशा मनी विलसणा:या हिरव्या स्वप्नांना अंकुरित करण्यासाठी शेतमळ्यात नेऊन सोडणा:याही. रोजच्या राबत्या सरावाच्या झाल्याने अचूकपणे घरी आणणा:या. कधी स्मृतीच्या कोशात कोरून घेऊन आकाराला येणा:या. कधी विस्मरण घडवणा:याही. ओळखीच्या कोण्या मदतीची प्रासंगिक सोबत करीत मुक्कामाचं ठिकाण गाठणा:या, कधी पांथस्थाला भरकटत ठेवण्यात आनंदणा:या, कधी चालत्या मार्गावरच्या त्याच वतरुळावर आणून पुन्हा उभे करणा:या, चालत्या वाटा अनपेक्षितपणे एखाद्या जंगलात हरवतात.                      (पूर्वार्ध)

Web Title: Share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.