पतीच्या स्मृती ‘त्यां’नी सामाजिक दायित्व निभावून जपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:29+5:302021-06-09T04:20:29+5:30
अमर संस्था, चोपडा यांचे वेले (ता. चोपडा) येथील मानवसेवा तीर्थ यांना व पद्मश्री पुरस्कार प्राप्त मॅगसेसे अवॉर्डप्राप्त ...
अमर संस्था, चोपडा यांचे वेले (ता. चोपडा) येथील मानवसेवा तीर्थ यांना व पद्मश्री पुरस्कार प्राप्त मॅगसेसे अवॉर्डप्राप्त नीलिमा मिश्रा यांच्या वानप्रस्थ आश्रम, बहादरपूर (ता. पारोळा) येथे प्रत्येकी एक लाख एकशेअकरा रुपये, सद्गुरु संत श्री सखाराम महाराज संस्थान, अमळनेर या संस्थेला एकवीस हजार रुपये, श्री तीर्थक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर (ता.अमळनेर) एकवीस हजार रुपये तर अयोध्या राममंदिर उभारणीसाठी अकरा हजार एकशेअकरा रुपये स्वरूपाची आर्थिक मदत केली आहे. त्यांनी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस रुपयांची मदत देऊन दातृत्वाचा परिचय करून दिला आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत हौसाबाई धनसिंग पाटील, त्यांचे पुत्र राजेंद्र धनसिंग पाटील आणि कल्पना राजेंद्र पाटील यांनी अंबरिश महाराज टेकडी ग्रुप, अमळनेर यांना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून २१ हजार रुपयाचे योगदान झाडे लावण्यासाठी दिले. या पैशातून वड, पिंपळ, उंबर, चिंच, निंब इ. पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा मानस मंडळाने केला असून, या जागेवर स्वतः उपस्थित राहून वृक्षारोपण करावे, अशी इच्छा मंडळाने व्यक्त केली आहे.
अंबरिश महाराज टेकडी ग्रुप, अमळनेर हा ग्रुप २०१३पासून निरंतर टेकडीवर श्रमदान करत असून, आतापर्यंत दहा हजार रोपांचे वृक्षारोपण केले आहे. टेकडी ग्रुप दररोज श्रमदान, पर्यावरण सेवा, झाडांना पाणी देणे कार्य करत आहे. याबद्दल पाटील परिवाराने मंडळाचे विशेष कौतुक केले आहे.
===Photopath===
070621\07jal_16_07062021_12.jpg
===Caption===
स्मृतिप्रित्यर्थ हौसाबाईंनी दिले पाच संस्थांना दान