देशप्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले : जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचरिका सुनीता वक्तेची करूण कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 03:57 PM2020-04-14T15:57:15+5:302020-04-14T15:58:30+5:30

एकीकडे आठ वर्षाचा मुलगा आजारी... दुसरीकडे आई आजारी... ती करत होती कोरोनाच्या रुग्णांची सेवा... देश प्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले होते...

She lost her motherly love and sonly love in front of patriotism: The compassionate story of district hospital superintendent Sunita Vakar | देशप्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले : जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचरिका सुनीता वक्तेची करूण कहाणी

देशप्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले : जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचरिका सुनीता वक्तेची करूण कहाणी

Next
ठळक मुद्देआधुनिक हिरकणी, आई गमावल्यानंतरही म्हणतेय, ‘कोरोनाग्रस्तांची सेवा करेलच’वडिलांनाही आरोग्य सेवेचा वारसाकोरोनाचा नायनाट होईल हीच खरी श्रद्धांजली

संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : एकीकडे आठ वर्षाचा मुलगा आजारी... दुसरीकडे आई आजारी... ती करत होती कोरोनाच्या रुग्णांची सेवा... देश प्रेमापुढे तिने मातृप्रेम आणि पुत्रप्रेम आटवले होते... अन् अचानक १३ रोजी आई सोडून गेली तरी ती म्हणते मी कोरोनाच्या रुग्णांची सेवा करेल हीच खरी माझ्या आईला श्रद्धांजली ठरेल! ही करुण कहाणी आहे अमळनेरचे सासर असलेली जळगाव जिल्हा रुग्णालयात अधिपरिचरिका असलेली सुनीता वक्ते (साळी) या हिरकणीची!
सुनीता संदीप साळी ही अमळनेर पैलाड येथील रहिवासी माहेरचे आडनाव वक्ते असल्याने सुनीता वक्ते नावाने जिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या विभागात काम करत असताना कोरोनाचा संसर्ग वाढला. जळगावात कोरोनाचा रुग्ण आढळला आणि डोळ्यांचा विभाग खाली करून कोरोना विभाग म्हणून करण्यात आला. साहजिक अधिपरिचरिका म्हणून सुनीताची जबाबदारी वाढली होती. संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे म्हणून कोरोनाच्या रुग्णांची सेवा हीच देशसेवा देशप्रेम मानून ती सेवा करू लागली. त्यामुळे घरी गेल्यानंतरसुद्धा तिला स्वतंत्र खोलीत क्वॉरंटाईन रहावे लागत होते. पती, मुलगा यांना भेटण्याची इच्छा असूनही तिला पुत्रप्रेमाला पोरके व्हावे लागले. अशातच मुलाला गाल सुजण्याचा आजार झाला. त्याला टॉन्सिलचा त्रास होत होता. मुलाला आईच्या भेटीची गरज होती. तिच्या मायेचा डोक्यावरून हात फिरावा असे वाटत असताना तो रडत होता. मात्र इकडे देश संकटात आहे म्हणून कोरोना हटवण्यासाठी तिने अश्रू डोळ्यातच आटवले. पतीला मुलाची जबाबदारी देऊन ती आपल्या कर्तव्यावर नियमित जात होती. हिरकणीने आपल्या पुत्रप्रेमापोटी राज्याचे नियम तोडले होते. पण आधुनिक हिरकणीने रुग्ण सेवा महत्वाची मानली, पण एवढे दु:ख कमी की काय म्हणून मलकापूरहून आई सुमनबाईचा निरोप आला की मी आजारी आहे मला भेटायला ये. सुनीताचे वडील वारलेले. भाऊ नाही, त्या सात बहिणी. मात्र आरोग्य विभागात असल्याने आईची जबाबदारी साहजिकच सुनीतावर होती. पण पुन्हा कोरोना डोळ्यासमोर आला अन् तिने काळजावर दगड ठेवला. ती आपले कर्तव्य करत राहिली. आईची तब्येत पुन्हा बिघडली होती. तिला ब्रेन हॅमरेज झाला होता. स्थानिक डॉक्टरांनी रिपोर्टशिवाय उपचार करायला नाही म्हटले. सुनीताला काय करावे सुचत नव्हते. अखेर रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात जळगावला आणण्यात आले. मात्र आईला एका वॉर्डात टाकण्यात आले. इकडे रुग्णांची सेवा आणि तिकडे फक्त आईची भेट आणि मुलाची आठवण, या त्रेधा मन:स्थितीत सुनीता आपली सेवा करीत होती. १३ एप्रिल रोजीची संध्याकाळ तिच्यासाठी अंधारमय ठरली. दैवाने तिच्या आईला हिरावून नेले होते. लॉकडाऊनमुळे तिच्या अंत्ययात्रेला फक्त सुनीताचे पती, जळगावातील बहीण आणि मेहुणे एवढे चारच जण हजर होते. दोघा मुलींनी अग्निडाग दिला.
वडिलांनाही आरोग्य सेवेचा वारसा
सुनीताचे वडील रणछोड वक्ते हेदेखील आरोग्य विभागात होते. आयुष्यभर कुष्ठ रोग्यांची सेवा केली. कॅन्सरने त्यांचा मृत्यू झाला होता. पण सेवेचा वारसा ते आपल्या मुलींना देऊन गेले होते. इकडे सासरी अमळनेरला साळी परिवारदेखील जनसेवेत परिचित आहे. प्रताप साळी, दीपक साळी दोन्ही जेठ कोरोनामध्ये गरिबांना धान्य वाटप व अन्नदान करीत आहेत. माहेरून आणि सासरी मिळालेला सेवेचा वारसा सुनीता अचूक जपत आहे.
कोरोनाचा नायनाट होईल हीच खरी श्रद्धांजली
गहिवरलेल्या आवाज, अश्रूंवर नियंत्रण मिळवून सुनीता म्हणाली की, वेळीच आईला सिटीस्कॅन केले असते, उपचारासाठी आणले असते तर कदाचित आजही तिचे प्रेम मला मिळाले असते. पण तरी कोरोनांच्या रुग्णांची सेवा करून जळगावमधून कोरोनाचा नायनाट होईल हीच खरी आईला श्रद्धांजली असेल

Web Title: She lost her motherly love and sonly love in front of patriotism: The compassionate story of district hospital superintendent Sunita Vakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.