पोषण आहाराची ‘ती’ बीले थांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:06 PM2019-11-26T13:06:07+5:302019-11-26T13:07:34+5:30
जळगाव : उन्हाळी सुट्ट्यांमध्येही पोषण आहाराच्या धान्यादी मालाची सुमारे एक कोटी ८३ लाखांची ठेकेदाराकडून सादर झालेली बिले थांबविण्यात आली ...
जळगाव : उन्हाळी सुट्ट्यांमध्येही पोषण आहाराच्या धान्यादी मालाची सुमारे एक कोटी ८३ लाखांची ठेकेदाराकडून सादर झालेली बिले थांबविण्यात आली असून मुख्याध्यापक स्तरावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहे़
दुष्काळी भागांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही शाळांमध्ये पोषण आहार द्यावा, असे पत्र शासनाने काढले होते़ मात्र, जिल्हाभरातील शाळांमध्ये विद्यार्थीच येत नसल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केंद्र प्रमुख व शिक्षकांनी केली होती़ असे असताना गुनिना कर्मिशलतर्फे या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केवळ धान्यादी मालाची १ कोटी ८३ लाखांची बिले सादर करण्यात आली होती़ यावर मोठा वादंग झाला होता़ राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती़ दरम्यान, आधी दहा टक्के शाळांच्या पावत्या तपासल्याचे शिक्षणविभागाकडून सांगण्यात येत होते़ ही बिले ठेकेदाराने केवळ सादर केली असून मुख्याध्यापकांकडून फेरतपासणी होत नाही, तोपर्यंत ती थांबविण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सीईओंनी दिल्याची माहिती आहे़ ठेकेदाराकडून पुन्हा जून जुलैचे साडेतीन कोटींच्यावर बील सादर केलेले आहे.