‘ती’ सहा बालके मिळण्यासाठी पंकजा मुंडे यांना साकडे
By admin | Published: July 27, 2016 12:11 AM2016-07-27T00:11:05+5:302016-07-27T00:11:05+5:30
टाटिया शिशुगृह प्रकरण : दोषींवर कारवाईचे दिले संकेत
Next
>
जळगाव : टाटिया शिशुगृहाच्या ताब्यातील ‘त्या’ तीन महिन्याच्या बालकासह अन्य पाच बालकांना संगोपनासाठी पुन्हा संस्थेच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी संस्थेचे सचिव वीरेंद्रप्रकाश धोका यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना साकडे. शुक्रवारी त्यांनी मुंडे यांची भेट घेतली. दरम्यान, शिशुगृहातील अनागोंदी व बालक नेण्याच्या प्रकरणात शिशुगृहाची मान्यता रद्द केली जाणार नाही, परंतु दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुंडे यांनी विधानसभेत दिली.
जळगाव जिल्ह्यातील एका अतिमहत्त्वाच्या व्यक्तीने व्यवस्थापकावर दबाव टाकून त्यांच्या परिचित व्यक्तीला हे तीन महिन्याचे बाळ बेकायदेशीरपणे देण्यात भाग पाडले आहे. याबाबत संस्थेने पोलीस स्टेशनला तक्रारही दिली आहे. आता अन्य बालकेही औरंगाबाद येथे हलविण्यात आली आहेत. संगोपनासाठी ती सर्व बाळे आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी धोका यांनी मुंडे यांच्याकडे केली.
जालन्याचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकरणाची आपण माहिती घेतली आहे. आयुक्त स्तरावर त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसातही तक्रार देण्यात आलेली आहे. बालकांच्या संगोपनाचा विषय असल्याने कोणत्याही शिशुगृहाची मान्यता रद्द केली जाणार नाही, मात्र अनियमितता व गैरप्रकार झाला असेल तर संबंधित दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुंडे यांनी दिले.
पुनर्वसनासाठी मंत्र्यांना निवेदन
जळगाव : शहरातील दहा वर्षीय पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेतून तिला तत्काळ पाच लाखाची मदत मंजूर करावी या मागणीसाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाच्या राज्य सहसंयोजक तथा बाल हक्क आयोगाच्या माजी सदस्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली.या भेटीत त्यांनी मुंडे यांना घटनेची माहिती दिली.
पीडित मुलगी सध्या बाल निरीक्षणगृहात आहे. मनोधैर्य योजनेतून मिळालेली रक्कम सज्ञान झाल्यानंतर तिला मिळू शकेल, जेणे करुन या रकमेतून तिचे पुनर्वसन होईल व भावी आयुष्य सुखकर होईल.या मुलीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रय}शील आहोत. दरम्यान, या मुलीला तत्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन मुंडे यांनी प्रा.पाटील यांना दिले. गेल्या आठवडय़ात प्रा.पाटील यांनी पीडित मुलगी व तिच्या आजीची भेट घेऊन मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत बाल कल्याण अधिका:यांशी चर्चा केली होती.
शिशुगृह प्रशासनाकडून न्यायालयात याचिका
बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार टाटिया शिशुगृहातील 6 बालकांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. या आदेशाविरोधात आता टाटिया शिशुगृह प्रशासनाने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
प्रभारी अधीक्षक गणेश परदेशी यांनी मूळ संस्थेच्यावतीने याचिका दाखल केली असून त्यात, बाल कल्याण समितीने बालकांना औरंगाबादला हलविण्यासाठी दिलेले आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.