दिवाळीलाही उपजिल्हा रुग्णालयात सुश्रुषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 04:50 PM2020-11-15T16:50:14+5:302020-11-15T16:51:53+5:30
सणासुदीला कर्मचारी सुटीचा आनंद घेतात, परंतु आरोग्यसेवा अत्यावश्यक सेवा आल्याने येथील उपजिल्हा रुग्णालतात लक्ष्मीपूजनप्रसंगीही वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी रुग्ण सेवा बजावली.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : सणासुदीला कर्मचारी सुटीचा आनंद घेतात, परंतु आरोग्यसेवा अत्यावश्यक सेवा आल्याने येथील उपजिल्हा रुग्णालतात लक्ष्मीपूजनप्रसंगीही वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांनी रुग्ण सेवा बजावली. नव्हे तर कोविड रुग्णांनाचीही सुश्रुषा केली. शनिवारी ऐन सायंकाळी विष प्राशन केल्याने दगावलेल्या रुग्णांची पाहणीही केली.
उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिका यांना सणासुदीला शासकीय सुट्या आणि कुटुंब यात कामाला प्राधान्य देत जवाबदारी आणि कुटुंबाची सांगड घालून दैनंदिन जीवन जगावं लागतं. अगदी दिवाळी असो की कुटुंबातील कार्यक्रम यात रुग्ण सेवेला प्राधान्य द्यावे लागते.
येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी दिवाळीच्या दिवशीही नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. सकाळ शिफ्टमध्ये नेहमीप्रमाणे तीन डॉक्टर आणि चार परिचारिका कामावर हजर होत्या. दुपार शिफ्टमध्ये ऐन लक्ष्मीपूजन वेळेपर्यंत डॉ.योगेश राणे आणि परिचारिका टी.आर.राठोड हे कर्तव्यावर हजर होते, तर रात्रीच्या शिफ्टलाही एक परिचारक कामावर हजर होते.
सणासुदीपेक्षा कर्तव्य महत्वाचे आहे. आपत्कालीन रुग्ण केव्हाही येऊ शकतात. शनिवारी लक्ष्मीपूजन दिवसाला कोविड रुग्णांची सुश्रुषा करून कर्तव्य बजावले. ऐन सायंकाळी विष प्राशन केलेला रुग्ण आला. दुर्दैवाने तो येथे येण्याअगोदर त्याची प्राणज्योत मालवली होती.
-प्रियंका आर.राठोड, अधिपरिचारिका, उपजिल्हा रुगणालय, मुक्ताईनगर