देविदासविरुद्ध शेगावला दोन गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:55+5:302021-04-27T04:16:55+5:30
या गुन्ह्यातील संशयित आरोपी देविदास ऊर्फ जिलेबी श्रीनाथ याच्याविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी ...
या गुन्ह्यातील संशयित आरोपी देविदास ऊर्फ जिलेबी श्रीनाथ याच्याविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो मूळचा शेगावचा आहे. काही वर्षांपूर्वी तो कुसुंबा येथे वास्तव्याला आला. बसस्थानक परिसरात त्याचे जिलेबीचे दुकान आहे. त्यामुळे जिलेबी नावानेच तो ओळखला जातो.
घटना उघड झाल्याच्या दिवशी गर्दीत अरुणाबाई देखील हजर
खुनाची घटना उघड झाली त्या दिवशी दुपारी अरुणाबाई वारंगणे ही घटनास्थळी आली होती. गर्दीतील लोकांकडून अंदाज घेत होती. चौकशी करीत असलेल्या पोलिसांकडे नजर लावून होती. या भागातील रहिवासी काय म्हणतायेत, पोलिसांचा अंदाज काय याकडे तिचे कटाक्षाने लक्ष होते. संध्याकाळी उशिरापर्यंत ती याच ठिकाणी होती, तर एक दिवस आधी मयत मुरलीधर यांचा दुचाकी व रिक्षाचालकाशी वाद झाला होता, तेव्हा जिलेबी याने त्यांना दुचाकीवर बसवून घरी सोडले होते.
कोट....
खुनाच्या घटनेत एक महिला व दोन पुरुष अशा तिघांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी महिलेने घेतलेल्या कर्जाचा तगादा बंद होईल व इतरांना घरातून आर्थिक लाभ होईल, अशी आशा होती. त्याच कारणाने ही घटना घडली आहे. आणखी दुसऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची चौकशी सुरू आहे, तपासात काही उघड झाले तर नक्कीच कारवाई केली जाईल.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक