शेंदुर्णी न.प.निवडणूक : राष्ट्रवादीच्या वृषाली गुजर सर्वात कमी तर भाजपाचे श्याम गुजर सर्वाधिक मतांनी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 05:19 PM2018-12-10T17:19:29+5:302018-12-10T17:24:47+5:30
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली गुजर या सर्वात कमी म्हणजे अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या. तर भाजपाचे शाम गुजर हे सर्वात जास्त ३६२ मतांनी विजयी झाले.
शेंदुर्णी, ता.जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली गुजर या सर्वात कमी म्हणजे अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या. तर भाजपाचे शाम गुजर हे सर्वात जास्त ३६२ मतांनी विजयी झाले.
१) भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या पत्नी चंदाबाई अग्रवाल यांनी राष्ट्रवादीच्या संगीता भावसार यांचा २६२ मतांनी पराभव केला.
२) प्रभाग ११ मधील भाजपाचे शाम गुजर यांनी राष्ट्रवादीचे प्रसन्न विठ्ठल फासे यांचा ३६२ मतांनी पराभव केला.
३) प्रभाग १४ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली गुजर यांनी भाजपाचे पंकज सूर्यवंशी यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. या प्रभागातील १५ मतदारांनी नोटा मतदानाचा वापर केला.
२९४ मतदारांकडून नोटाचा वापर
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मतदान करताना ६९ मतदारांनी नोटाचा वापर केला. तर प्रभाग १ ते १७ मध्ये नोटाचा वापर करणाऱ्यांची संख्या २२५ आहे.
शिवसेनेला २७५ तर मनसेला २८ मते
शेंदुर्णी नगरपंचायतीसाठी आठ प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवारांना २७५ तर मनसेच्या उमेदवारांना ९८ मते मिळाली. तर नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या मनिषा बारी यांना १६८ तर मनसेच्या सरीता चौधरी यांना ८८ मते मिळाली.