शेंदुर्णी न.पा. निवडणुकीत पाणी योजना अन् घराणेशाहीचा मुद्दा प्रभावी

By विलास.बारी | Published: December 3, 2018 06:38 PM2018-12-03T18:38:58+5:302018-12-03T18:43:03+5:30

भाजपा आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत ऐन थंडीच्या दिवसात सोयगाव येथील प्रलंबित पाणी योजना आणि घराणेशाहीच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे.

Shendurni N.P. Water planning and dynastic issues are effective in elections | शेंदुर्णी न.पा. निवडणुकीत पाणी योजना अन् घराणेशाहीचा मुद्दा प्रभावी

शेंदुर्णी न.पा. निवडणुकीत पाणी योजना अन् घराणेशाहीचा मुद्दा प्रभावी

googlenewsNext
ठळक मुद्देविकास कामांवरून आरोप प्रत्यारोपबारी,गुजर व मराठा मते निर्णायकसंरक्षक भिंत, मुख्य रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक अन् पाण्यावरून आरोप-प्रत्यारोप

विलास बारी
जळगाव : भाजपा आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत ऐन थंडीच्या दिवसात सोयगाव येथील प्रलंबित पाणी योजना आणि घराणेशाहीच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. सत्तेसाठी बहुसंख्य बारी समाज, मराठा समाज, गुजर आणि मुस्लीम बांधवांची मते निर्णायक ठरणार आहेत.
स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी, शिवसेना, मनसे व काही अपक्षांनी रणांगणात उडी घेतली आहे. त्यामुळे प्रचारातील रंगत वाढली आहे.
भाजपात अंतर्गत धुसफूस तर राष्ट्रवादीचा सावध पवित्रा
गेल्या निवडणुकीत माजी जि.प. सदस्य संजय गरूड यांना अतिआत्मविश्वासाचा फटका बसून हातातून सत्ता गेली होती. यावेळी त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. मतांचे विभाजन नको म्हणून त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करीत बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. बहुसंख्य असलेल्या बारी समाजातील तब्बल पाच उमेदवार त्यांनी दिले. त्यातच व्यावसायिक भास्कर ढगे यांच्या कुटुंबातील सदस्य व प्रसन्न फासे यांना उमेदवारी देत बारी समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे नगराध्यक्षपदासाठी विजया खलसे यांच्यासोबतच भाजपाचे जुने कार्यकर्ते उत्तम थोरात यांच्या सून कल्पना थोरात व गुजर समाजाच्या सारीका सूर्यवंशी यांची नावे चर्चेत होती. गोविंद अग्रवाल यांचे समर्थक व विद्यमान सरपंच विजया खलसे यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपामध्ये काही प्रमाणात अंतर्गत नाराजी आहे.
शिवसेना व मनसेची स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत
जामनेर तालुक्यात भाजपामुळे शिवसेना वाढली नाही हा राग आहेच. आपले अस्तित्व दाखविण्यासाठी शिवसेने निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. तसेच गेल्यावेळी गुजर समाजाच्या सदस्याला भाजपाकडून अडीच वर्ष सरपंचपद न मिळाल्याचा मुद्दा प्रभावी आहे. तोच प्रकार मनसेच्या बाबतीतही आहे. वैद्यकीय व्यवसायीक व संस्थाचालक असलेले डॉ.विजयानंद कुलकर्णी पक्षाचे अस्तित्व दाखविण्यासाठी ९ जागांवर उमेदवार दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या उमेदवार उच्चशिक्षीत
राष्ट्रवादीच्या उमेदवार क्षितीजा गरूड या बीएसस्सी कॉम्प्युटर व एमबीए झालेल्या आहेत. वडिलांचा राजकीय वारसा त्यांच्या सोबत आहे. तर विद्यमान सरपंच व भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया खलसे यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे पती अमृत खलसे हे प्रगतीशील शेतकरी व सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवसेना उमेदवार मनिषा बारी यांचे दहावी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांच्या पतींचा वेल्डींग वर्कशॉपचा व्यवसाय आहे. तर मनसे उमेदवार सरिता चौधरी यांचे इयत्ता ९ वीपर्यंत शिक्षण आहे. त्यांचे पती खाजगी शाळेत कर्मचारी आहेत.
भाजपा व राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढत
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर, पालघर व जळगावातील निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर शेंदुर्णी नगरपंचायतीतील यशाची परंपरा कायम ठेवण्याचे आव्हान आहे. शेंदुर्णी नगरपंचायतीची सूत्र जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्याकडे आहेत. तर भाजपाच्या विजयाची परंपरा खंडीत करण्याचे आव्हान माजी जि.प.सदस्य संजय गरूड यांच्यासमोर आहे. त्यामुळे भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

विद्यमान सत्ताधाºयांकडून शेंदुर्णी येथील सोन नदीवर बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. या संरक्षक भिंतीसाठी खोलवर भिंत बांधल्यामुळे जलस्त्रोत आटल्याचा आरोप होत आहे.

मुख्य रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविल्याचा दावा सत्ताधाºयांकडून केला जात आहे. मात्र चांगल्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याऐवजी वाढीव वस्तीमध्ये हा निधी खर्च केला असता तर सुविधा झाली असती. सत्ताधाºयांकडून विकासकामांचे समर्थन केले जात असतांना विरोधकांकडून झालेली कामे निकृष्ट असल्याचा दावा केला जात आहे.

सध्या शेंदुर्णीला १२ ते १३ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सोयगाव येथील पाणी योजना संजय गरूड यांची सत्ता असताना मंजूर झालेली असली तरी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपाच्या विद्यमान पदाधिकाºयांना यशस्वी तोडगा न काढता आल्याने गाव तहानलेले असल्याचा आरोप आता होत आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार शेंदुर्णीची लोकसंख्या २२ हजार ५०० इतकी आहे. सध्यस्थितीत सुमारे ३५ हजार लोकसंख्या आणि १८ हजार मतदार आहेत. यात सर्वाधिक तीन हजार मतदार हे बारी व मराठा समाजाचे आहेत. त्यापाठोपाठ अडीच हजार गुजर व मुस्लिम समाज,८०० ते १००० मतदार हे प्रत्येकी बौद्ध व मारवाडी समाजाचे १२०० मतदार तेली समाजाचे सुमारे ७०० मतदार धनगर समाजाचे, सुमारे ६०० मतदार कोळी समाजाचे तर ४०० ते ५०० मतदार हे माळी समाजाचे आहेत.

भाजप व राष्ट्रवादी ने दिले सर्वाधिक उमेदवार
शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवित नगरसेवकपदासाठी १७ व नगराध्यक्षपदासाठी एक असे १८ उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. त्यात राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासह १६ तर काँग्रेसने २ जागांवर उमेदवार दिले आहेत. पहिल्यांदा निवडणूक लढविणाºया शिवसेना व मनसेने नगराध्यक्षपदासह प्रत्येकी ९ उमेदवार दिले आहेत. १९२२ मध्ये शेंदुर्णी ग्रा.पं.ची स्थापना झाली होती. १९८० मध्ये वसंत सूर्यवंशी व त्यानंतर १९८८ मध्ये डिगंबर बारी सरपंच होते. हा काळ वगळता ग्रामपंचायतीवर गरूड परिवाराचे वर्चस्व राहिले आहे.

 

भाजपा विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणार आहे. शेंदुर्णीच्या इतिहासात वर्षानुवर्षे गरुड कुटुंबियांकडे सत्ता राहिली. पाच वर्षांपूर्वी आम्हाला सत्ता मिळाल्यानंतर गावातील मुख्य रस्ता, सोन नदीवरील संरक्षक भिंत, स्मशानभूमी सुशोभिकरण, धार्मिक क्षेत्राचा विकास केला. भविष्यात १०० कोटींची वाघूर येथून पाणी योजना,शेंदुर्णी गावाला तालुक्याचा दर्जा तसेच आरोग्य, साफसफाई व पारदर्शक कामांचा प्रयत्न राहणार आहे.
-गोविंद अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा.

सोयगाव येथील ज्या धरणावरून शेंदुर्णीला पाणी पुरवठा होतो त्या धरणाची उंची एक मीटरने वाढवावी अशी मागणी आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना हे एकमेव काम करता आले नाही. आम्ही मंजूर केलेली ही योजना सत्ताधाºयांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत अडकली. सत्ताधाºयांनी केलेली निष्कृष्ट दर्जाच्या विकासकामांची तक्रार केल्यानंतरही मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे कारवाई होत नाही.
-संजय गरूड, माजी सदस्य, जिल्हा परिषद, जळगाव.

भाजपा व राष्ट्रवादी या दोघांच्या वादात शेंदुर्णीचे नागरिक मुलभूत सुविधा व विकास कामांपासून वंचित राहिले आहेत. आम्ही विकासाचे व्हीजन घेऊन निवडणूक लढवित आहोत. शेंदुर्णीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नाल्याची समस्या मोठी आहे. माघारीसाठी अनेक आमिषे दाखविली गेली. शिवसेना व मनसेच्या उमेदवारांनी परस्परांना सहकार्य करावे याबाबत चर्चा सुरु आहे. आम्हाला यश निश्चित मिळेल.
-डॉ.विजयानंद कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष, मनसे.

भाजपा आणि राष्ट्रवादीने शेंदुर्णीकरांना वाºयावर सोडले आहे. जामनेर तालुक्यात भाजपाचे शिवसेनेला वाढू न देण्याच्या धोरणाविरूद्ध आणि शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आम्ही निवडणुकीला समोरे जात आहोत. समाजातील सर्व घटकातील उमेदवारांना आम्ही प्राधान्य दिले आहे. रस्ते, साफसफाई, आरोग्य आणि पाणी या मुलभूत सुविधांवर आमचा भर राहणार आहे. निवडणुकीत विजय नक्कीच मिळणार आहे.
-संजय सूर्यवंशी, शहर प्रमुख शिवसेना, शेंदुर्णी.

Web Title: Shendurni N.P. Water planning and dynastic issues are effective in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.