शेेंगोळा यात्रोत्सव आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 04:13 PM2019-12-11T16:13:10+5:302019-12-11T16:42:43+5:30
शहापूर शिवारातील मार्गशीर्ष पौर्णिमा १२ पासून ढोल ताशांंच्या गजरात तुळसाबाई यात्रोत्सव अर्थात शेंगोळा यात्रेस सुरुवात होणार आहे.
गजानन कोळी
तळेगाव, ता.जामनेर, जि.जळगाव : शहापूर शिवारातील मार्गशीर्ष पौर्णिमा १२ पासून ढोल ताशांंच्या गजरात तुळसाबाई यात्रोत्सव अर्थात शेंगोळा यात्रेस सुरुवात होणार आहे. हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते.
दानशूर मोहनगीर गोसावी यांनी संस्थानला चार एकर शेती दान दिली. तसेच माजी आमदार आबाजी नाना पाटील यांनी मोेठे आर्थिक सहकार्य केले आहे. १५ दिवस चालणाºया या यात्रोत्सवात हिंदी, मराठी चित्रपट टॉकीज, नामवंत तमाशे, लोकनाट्य, मोठमोठे पाळणे, ब्रेकडान्स, सर्कस, मिठाईची दुकाने आदी दुकाने थाटली जातात. या यात्रेत रोज लाखो रुपयांची उलाढाल होते.
भाविकांच्या सुरक्षेसाठी जामनेर पोलीस, शहापूर ग्रामपंचायत यांचे नियंत्रण असते. भाविकांच्या आरोग्याची काळजी म्हणून सरकारी दवाखाना, अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग आदी काळजी घेतली जाते.