जळगाव कारागृहात शिजला गोळीबाराचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:26 AM2020-12-05T04:26:26+5:302020-12-05T04:26:26+5:30
चाळीसगाव : जळगाव जेलमध्ये असलेला आरोपी हैदरअली आसिफअली सैय्यद हा चाळीसगाव येथील गोळीबार प्रकरणातील मास्टरमाईड असल्याचे तपासात निष्पन्न झाले ...
चाळीसगाव : जळगाव जेलमध्ये असलेला आरोपी हैदरअली आसिफअली सैय्यद हा
चाळीसगाव येथील गोळीबार प्रकरणातील मास्टरमाईड असल्याचे तपासात निष्पन्न झाले
आहे. त्याने जुबेर शेख याच्यावर फायरिंग करून त्याचा खून करण्याची सुपारी दिली
असल्याची कबुली अटकेतील आरोपीने दिली आहे. सुपारी देण्याचा कट जळगाव जेलमधून
शिजला आहे. यात आणखी तीन साथीदाराच्या समावेश असून त्यांचा शोध घेण्यासाठी
ठिकठिकाणी पथके रवाना झाली असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली.
या गुन्ह्यातील फिर्यादी जुबेर शेख उर्फ बंबय्या व मुख्य आरोपी मास्टर माईड हैदरअली
यांच्यामध्ये ऑक्टोबर २०२० मध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल होते. त्याच गुन्ह्यामध्ये
हैदरअली सैय्यद व त्याचे सोबतचे पाच आरोपीस अटक करून त्यांची रवानगी जिल्हा
कारागृहात करण्यात आलेली होती. त्यापैकी काही जामीनावर सुटलेल्या आरोपींतांचा ही या
गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आले आहे. मास्टर माईड हैदरअली व त्याच्या
साथीदारांसोबत याबाबत नियोजन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
जळगावचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गेल्या वर्षी आयर्न पार्क जवळ केलेल्या
गोळीबार आपणच केल्याची ही कबुली आरोपी अरबाजने पोलिसांसमोर केली
आहे. याप्रकरणी जळगाव पोलिसात त्याच्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
28 रोजी दुपारी चार वाजता फिर्यादी शेख मोहम्मद साबीर मोहम्मद गालिब हा त्याचे
मित्रांसोबत हुडको कॉलनीतील भंगार गोडाऊन जवळ बसला असताना
दोन मोटार सायकलवर येवून पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याच्यावर
पिस्तुल मधून फायर केला होता.
या गुन्ह्यातील आरोपीतांच्या शोधासाठी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस
अधिक्षक सचिन गोरे,पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे,पोलीस निरीक्षक विजयकुमार
ठाकूरवाड,एलसीबीचे पोलीस निरीक्षक बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग
पाटील,सुधाकर अंभुरे ,राहुल पाटील,ओंकार सुतार, निलेश पाटील,दिपक पाटील,विनोद
खैरनार यांचे पथक नेमण्यात आले होते.
या गुन्ह्यात मोटारसायकलवर पाठीमागे बसून फायरिंग करणारा इसम हा अरबाज दाऊद
पिंजारी रा.जळगाव यास या पथकातील विजय पाटील,सुधाकर अंभुरे,राहुल पाटील व
सोबतच्या पोलीसांनी धुळे येथे अटक केली होती.या आरोपीला पाच तारखेपर्यंत न्यायालयाने
पोलीस कोठडी दिली आहे.यापुढील तपास सहाय्यक पीस निरीक्षक निसार सैय्यद करीत
आहेत.
फोटो मॅटर-
गोळीबार प्रकरणातील आरोपी अरबाज दाऊद पिंजारी याचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी