पारोळा येथे शिंपी समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:03 PM2018-08-10T18:03:05+5:302018-08-10T18:03:37+5:30
पाठीवरील शाबासकी म्हणजे पुढील वाटचालीसाठी पंखात बळ : गोविंद शिरोळे
पारोळा, जि.जळगाव : येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे विविध क्षेत्रात गुणवत्ता व मानाचे स्थान मिळविणारे गुणी विद्यार्थी व समाज बांधवांचा गौरव करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर निकम, रघुनाथ शिंपी, वना शिंपी, नगरसेवक मनोज जगदाळे, प्रा.भालचंद्र सोनवणे, स्वप्नील कापुरे, लीलाधर शिंपी, वसंतराव शिंपी, जानकीराम शिंपी, विश्वनाथ शिंपी, मणीलाल शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी समाजातर्फे स्वप्नील कापुरे याच्या ‘एक दुपार’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून त्यांचा जाहीर सत्कार समाज बांधवांनी केला, तर विविध क्षेत्रात व परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी स्वप्नील कापुरे यांनी, मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडू द्या, त्यांच्यावर लादू नका, असे पालकांना विनंती करीत सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून गोविंद शिरोळे यांनी समाजाने विद्यार्थ्यांना गौरविणे म्हणजे पाठीवरून शाबासकीची थाप ठेवणे आणि पुढील वाटचालीसाठी पंखात बळ देणे होय, असे सांगितले.
सूत्रसंचालन भटू शिंपी तर आभार सुनील शिंपी यांनी मानले.
या वेळी समाज अध्यक्ष सुनील काशिनाथ शिंपी, उपाध्यक्ष सुनील शांताराम शिंपी, विजय मेटकर, श्रीकांत शिंपी, डॉ.नंदू सौंदानी, वसंतराव कापुरे, प्रकाश टेलर, रमेश शिंपी, पांडुरंग शिंपी, माधवराव शिंपी बंडू शिंपी, बापू शिंपी, नितीन टेलर, संदीप शिंपी, लोटन शिंपी, विनोद धोत्रे मान्यवर उपस्थित होते
या आधी संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल पालखी आणि शोभायात्रा काढण्यात आली होती. महाप्रसाद देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भटू शिंपी यांनी महाप्रसादाचे नियोजन केले.