पाचोरा येथील शिंदे परिवाराने कर्जमाफी न घेण्याचा निर्णय

By Admin | Published: June 13, 2017 10:17 PM2017-06-13T22:17:59+5:302017-06-13T22:17:59+5:30

मात्र पाचोऱ्यातील शिंदे परिवाराने शासनाच्या कर्जमाफीचा लाभ न घेण्याचे ठरविले आहे.

The Shinde family at Pachora did not want to waive debt | पाचोरा येथील शिंदे परिवाराने कर्जमाफी न घेण्याचा निर्णय

पाचोरा येथील शिंदे परिवाराने कर्जमाफी न घेण्याचा निर्णय

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पाचोरा, दि. 13 -  शासनाने सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्या ने अनेक धनदांडग्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ होणार आहे, मात्र पाचोऱ्यातील शिंदे परिवाराने शासनाच्या कर्जमाफीचा लाभ  न घेण्याचे ठरविले आहे. सतीश परशराम शिंदे, रुपेश सतीश शिंदे, विजयाबाई सतिष शिंदे हे तीन  शेतकरी कृष्णापुरी विकास सोसायटीचे कर्जदार सभासद असून त्यानी नियमितपणे कर्जफेड केलेली असली तरी शासन निकशाप्रमाणे कर्जमाफि मिळाल्यास ती आम्ही नाकारत असून गरीब व गरजू शेतकऱ्याला लाभ द्यावा , आमचे नाव कर्ज माफिच्या यादीत घेऊ नये असे पत्र  सतीश शिंदे यांनी पाचोरा तहसीलदार यांना दिले असल्याची माहिती खुद्द सतिष शिंदे यांनी लोकमत ला दिली. 
दरम्यान सतीश शिंदे यांचा आदर्श धनाढ्य शेतकऱ्यांनी घेऊन कर्जमाफी नाकारावी व गरजू गरीब शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा आहे

Web Title: The Shinde family at Pachora did not want to waive debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.