शिंदेंची बदली अन् कर्मचा-यांचा सुटकेचा नि:श्वास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 04:20 PM2019-03-09T16:20:12+5:302019-03-09T16:22:52+5:30

पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची गेल्या आठवड्यात बदली झाली. तशी शिंदे यांच्या बदलीची अनेक दिवसापासून चर्चा सुरु होतीच,किंबहूना त्यासाठी काही विशिष्ट गटही प्रयत्नशील होता. शिंदे यांच्या बदलीची ज्या दिवशी आर्डर आली, त्या दिवशी अधिकारी व कर्मचाºयांनी (सर्वच नाही) सुटकेचा नि:श्वास सोडला.

Shinde's transfer and the freedom of the work-freedom! | शिंदेंची बदली अन् कर्मचा-यांचा सुटकेचा नि:श्वास !

शिंदेंची बदली अन् कर्मचा-यांचा सुटकेचा नि:श्वास !

Next
ठळक मुद्देविश्लेषण विशिष्ट गटाची मक्तेदारी सुरु आणखी घडामोडीचे संकेत

सुनील पाटील
जळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची गेल्या आठवड्यात बदली झाली. तशी शिंदे यांच्या बदलीची अनेक दिवसापासून चर्चा सुरु होतीच,किंबहूना त्यासाठी काही विशिष्ट गटही प्रयत्नशील होता. शिंदे यांच्या बदलीची ज्या दिवशी आॅर्डर आली, त्या दिवशी अधिकारी व कर्मचा-यांनी (सर्वच नाही) सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या एका विभागात तर पेढेही वाटल्याची चर्चा आहे. दुसरीकडे बहुतांश कर्मचा-यांच्या मते शिंदे यांची अजून बदली व्हायला नको होती.
शिंदे यांच्या बदलीनंतर प्रामुख्याने काही बाबी प्रकर्षाने जाणवू लागल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयात येताना हेल्मेट सक्ती बंद झाली. अवैध धंदे चालक व त्यांच्याशी संबंधित अधिकारी, कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. ग्रामीण भागात अवैध धंदे पुन्हा सुरु झाले.स्थानिक गुन्हे शाखेची बंद झालेली बीट संकल्पना पुन्हा सुरु झाली. काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी पुन्हा सुरु झाली. 
या सा-या बाबी आता उघडपणे कोणी दिसायला लागल्या आहेत. शेवटी राजाची भूमिका कशी, त्यावरच प्रजाचे कामकाज चालते. माझ्या बदलीने अवैध धंदे चालकांमध्ये आनंदाचे वातावरण असेल, असे खुद्द शिंदे यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलून दाखविले. त्यांच्या बोलण्यात शंभर टक्के तथ्यही आहे. नूतन पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले अजून बैठकांमध्येच व्यस्त आहेत. लोकसभा निवडणूक महत्वाची असल्याने साहजिकच त्याबाबत पोलीस दलाची भूमिका महत्वाची असणार आहे. 
त्यामुळे उगले यांच्यासाठी या निवडणूका पारदर्शक व विना वादाने पार पाडण्याचे आव्हान आहे. येणा-या काळात पोलीस दलात मोठ्या व महत्वाच्या पदावर आणखी काही फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याची चर्चा वेगात सुरु आहे, मात्र त्याला आचारसंहितची आडकाठी आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच काय त्या घडामोडी घडतील. त्यामुळे येणा-या काळात काय घडामोडी घडतात हे पाहणेच औत्सुकत्याचे आहे.

Web Title: Shinde's transfer and the freedom of the work-freedom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.