रावेर स्थानकावरून माल पाठविण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 04:40 PM2020-05-08T16:40:32+5:302020-05-08T16:40:58+5:30
रावेर रेल्वेस्थानकावरून व्यापारी वर्गाकडून सतत होत असलेल्या मागणीनुसार रेलवे प्रशासनाने माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
भुसावळ, जि.जळगाव : विभागातील रावेर रेल्वेस्थानकावरून व्यापारी वर्गाकडून सतत होत असलेल्या मागणीनुसार रेलवे प्रशासनाने माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी ही सुविधा बंद करण्यात आली होती. परंतु आता ही सुविधा व्यापारी वर्गाकडून मागणी आल्यानंतर सुरू करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात रावेर व यावर या तालुक्यातून संपूर्ण देशामध्ये केळीची निर्यात केली जाते. केळी व्यापाऱ्यांसाठी सुरू केलेल्या या सुविधेमुळे आपला माल इतर ठिकाणी सहज पाठवू शक्य होणार आहे. ही सुविधा ६ मेपासून सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर उघडण्यात आली आहे.
रावेर स्थानकातून मका, ज्वारी, गहू, डाळ इत्यादी (लूज कमोडिटी आणि पी.ओ.एल. सोडून) जीवनावश्यक वस्तू पाठवता येणार आहे. रावेर स्थानक उघडण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांकडून पहिल्या २१ वॅगन गव्हाचा रॅक एसजीडब्युएफ (व्हाईट फिल्ड सॅटेलाईट गुडस टर्मिनल बंगलोर) येथे पाठविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त रावेर स्थानकावरून केळीसाठी पार्सल वॅगनव्दारे माल पाठवण्याची सुविधा सुरू आहे.
या सुविधेचे व्यापारी वर्गाने स्वागत केले असून, मोठा दिलासा मिळाला आहे.