शिर्डी-भुसावळ बसच्या वाहकाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:56 PM2018-08-27T13:56:00+5:302018-08-27T13:57:28+5:30

एसटी बसमध्ये मागे रिकाम्या असलेल्या सीटवर बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने मजहर अकबर खान (वय ४५, रा.भुसावळ) याने शिर्डी-भुसावळ बसचे वाहक महेंद्र एकनाथ पाटील (वय २६, रा.नशिराबाद, ता.जळगाव) यांना बसमध्येच बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी पावणे अकरा वाजता अजिंठा चौकात घडली.

Shirdi-Bhusawal beat the driver of the bus | शिर्डी-भुसावळ बसच्या वाहकाला बेदम मारहाण

शिर्डी-भुसावळ बसच्या वाहकाला बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देजळगावातील अजिंठा चौकात झाली घटनाएस.टी.बसमधील प्रवाशाला केली अटकरिकाम्या सीटवर बसण्यास सांगितल्याने झाला वाद

जळगाव : एसटी बसमध्ये मागे रिकाम्या असलेल्या सीटवर बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने मजहर अकबर खान (वय ४५, रा.भुसावळ) याने शिर्डी-भुसावळ बसचे वाहक महेंद्र एकनाथ पाटील (वय २६, रा.नशिराबाद, ता.जळगाव) यांना बसमध्येच बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी पावणे अकरा वाजता अजिंठा चौकात घडली. दरम्यान, मजहर याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महेंद्र पाटील व चालक रोशन लक्ष्मण तायडे (वय ३२, रा.कठोरा, ता.भुसावळ) हे एस.टी.महामंडळात भुसावळ आगारात नोकरीला आहेत. या दोघांची सोमवारी शिर्डी-भुसावळ (क्र.एम.एच.१० बी.एल.२३९४) या भुसावळ आगाराच्या बसवर ड्युटी होती.
शिर्डीहून जळगावात आल्यानंतर ही बस सकाळी पावणे अकरा वाजता भुसावळ जाण्यासाठी अजिंठा चौकात आली. तेथून १५ प्रवाशी या बसमध्ये चढले. मजहर खान हा देखील या बसमध्ये चढला. बसमध्ये मागे शीट रिकामे असल्याने वाहक महेंद्र पाटील यांनी सर्व प्रवाशांनी मागे जावून सीटवर बसण्याची सूचना केली असता मजहर याने त्यांच्याशी हुज्जत घातली.
हा वाद वाढल्याने चालकाने बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेली. तेथे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, संभाजी पाटील, दिनकर खैरनार, भरत लिंगायत यांनी बस चालक, वाहक व प्रवाशांकडून घटनेची माहिती जाणून घेत मजहर खान याला ताब्यात घेतले.
महेंद्र पाटील यांनी फिर्याद दिल्याने शासकीय कामात अडथळा, धमकी व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मजहर याला लागलीच अटक करण्यात आली. त्यानंतर बस पुढच्या प्रवासाला रवाना झाली.

Web Title: Shirdi-Bhusawal beat the driver of the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.