पर्यावरणीय व मानवजातीच्या शाश्वत विकासासाठी शिरीष बर्वे यांचे आठ दिवस अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 12:19 PM2020-08-17T12:19:49+5:302020-08-17T23:39:14+5:30

चळवळ : सोशल मीडियावरून पर्यावरण रक्षणासाठी आवाहन  जळगाव : औद्योगिक प्रगतीमुळे  अंगिकारलेली जीवनशैली, त्यातून निर्माण होणाºया पर्यावरणविषयक समस्या, त्यातून ...

Shirish Barve's eight-day hunger strike for environmental and sustainable development of mankind | पर्यावरणीय व मानवजातीच्या शाश्वत विकासासाठी शिरीष बर्वे यांचे आठ दिवस अन्नत्याग

पर्यावरणीय व मानवजातीच्या शाश्वत विकासासाठी शिरीष बर्वे यांचे आठ दिवस अन्नत्याग

Next

चळवळ : सोशल मीडियावरून पर्यावरण रक्षणासाठी आवाहन 

जळगाव : औद्योगिक प्रगतीमुळे  अंगिकारलेली जीवनशैली, त्यातून निर्माण होणाºया पर्यावरणविषयक समस्या, त्यातून पुढे येणारे गंभीर परिणाम व तरीदेखील न बदलणारी मानसिकता, हे सर्व प्रकार पर्यावरसाठी घातक ठरत असून  हे रोखणे गरजेचे असल्याने  याकडे लक्ष वेधण्यासाठी जळगावात चळवळ सुरू झाली आहे. यामध्ये आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी स्वातंत्र्य दिन, १५ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट दरम्यान अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या चळवळीत सहभागीसाठी आवाहनही केले आहे. 
पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे संयम  
आठ दिवस उपवास करून स्वत:चाच संयम व या गंभीर विषयाबाबत निर्धार तपासण्यासाठी आठ दिवस उपवास करीत असल्याचे बर्वे यांनी सांगितले.  

भावी पिढीसाठी सहभागी व्हा
४० वर्षांखालील सर्व तरुण पिढीने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, ४० वर्षांवरील पिढी ज्यांना त्यांच्या भविष्यातील पिढ्यांची काळजी आहे त्यांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन बर्वे यांनी केले आहे.   या सोबतच सर्व पक्षांचे राजकारणी, जे हा बदल घडवून आणू शकतात त्यांनी मतांचे राजकारण बाजूला ठेऊन भविष्यातील पिढ्यांच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

या आठ दिवसात याविषयासाठी तयार केलेल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून  संदर्भातील महत्त्वाचे  विषय मांडून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे,  अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

योग्य प्रबोधन आवश्यक
या समस्येचा सामना करण्यासाठी  मोदी सरकारने काही प्रमाणात पावले उचलत या बद्दल बोलायला सुरुवात केली आहे. मात्र प्रस्थापित गल्ली ते दिल्ली बहुतेक सर्व राजकारणी व सरकारी यंत्रणा याविषयी अशिक्षित असल्यामुळे त्यांना या समस्येच्या व्याप्तीचे गांभीर्य कळूच शकत नाही. समाज उदासीन आहे असे अजिबात नाही. त्यांचे योग्य प्रबोधन करून त्यांना जागृतच केलं जात नाही, ही खरी समस्या असून यासाठी हे प्रबोधन आवश्यक असल्याने ही चळवळ सुरू झाली आहे. 
तिसरे महायुद्ध पर्यावरण बदलाच्या विरुद्ध लढले जाणार असून हे दीर्घ काळ चालणारे युद्ध आहे, असे शिरीष बर्वे यांचे म्हणणे आहे. आता ही जागतिक आणीबाणीची परिस्थिती असून गेल्या ३०० वर्षात मानवाच्या अधिकाधिक प्रगतीच्या नादात केवळ ओरबाडण्याच्या हव्यासा पायी  मानव आपल्या ओझ्याने पृथ्वीवरील समस्त सजीव सृष्टीला काहीशे कोटी वर्षाच्या दरीत ढकलतो की आपले ओझे उलट बाजूला टाकून समस्त सजीव सृष्टी वाचवण्याचा निर्णय घेतो, यावर समस्त मानव जातीची प्रगल्भता सिद्ध होणार असल्याचे बर्वे यांचे म्हणणे आहे.  

भावी पिढीसाठी सहभागी व्हा
४० वर्षांखालील सर्व तरुण पिढीने यात सक्रिय सहभाग नोंदवावा, ४० वर्षांवरील पिढी ज्यांना त्यांच्या भविष्यातील पिढ्यांची काळजी आहे त्यांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन बर्वे यांनी केले आहे.   या सोबतच सर्व पक्षांचे राजकारणी, जे हा बदल घडवून आणू शकतात त्यांनी मतांचे राजकारण बाजूला ठेऊन भविष्यातील पिढ्यांच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 
या आठ दिवसात याविषयासाठी तयार केलेल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून  संदर्भातील महत्त्वाचे  विषय मांडून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे,  अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. 
 
सामाजिक चळवळ उभारण्याचा  प्रयत्न
हा राजकीय विषय नसून समस्त मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. आत्ता जन्माला आलेल्या बाळापासून ते ४० वर्षांखालील तरुण पिढीचे भविष्य चांगले व्हावे, त्यांची पर्यावरण पूरक जीवनशैलीची मूल्ये वाढीस लागावीत, त्यासाठी एक सामाजिक चळवळ उभारण्याचा हा प्रयत्न असल्याचे बर्वे यांचे म्हणणे आहे. 
 
या समस्येबाबत आपण रोज ऐकतो, पण ती समस्या किती गंभीर आहे आणि या समस्येला आपण मानव समूह कसा जबाबदार आहे याचा आपण  विचारच करीत नाही.   औद्योगिक प्रगतीमुळे आपण अंगिकारलेल्या जीवनशैलीमुळेच ही समस्या उत्पन्न झालेली आहे. आपल्याला आपली जीवनशैली आमूलाग्र बदलावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला आपली मानसिकता बदलाय आहे, असे आवाहन बर्वे यांनी केले असून यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली आहे. 

 

Web Title: Shirish Barve's eight-day hunger strike for environmental and sustainable development of mankind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव