शिरपूर टोल नाकाप्रश्नी जनहित याचिका दाखल
By admin | Published: January 11, 2016 12:35 AM2016-01-11T00:35:09+5:302016-01-11T00:35:09+5:30
शिरपूर फाटय़ालगतचा टोल नाका बेकायदेशीर असल्याबाबत येथील अमोल गोविंद अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
शिरपूर : शिरपूर फाटय़ालगतचा टोल नाका बेकायदेशीर असल्याबाबत येथील अमोल गोविंद अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना हजर राहण्याबाबत नोटीस पाठविली आह़े याच प्रश्नासंदर्भात अग्रवाल यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली जनहित याचिका फेटाळण्यात आली होती़ त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टोलनाका न.पा. हद्दीपासून 10 कि.मी.वर असावा, असा नियम असताना शिरपूरचा टोल नाका गावापासून अवघ्या अडीच कि.मी. अंतरावर आहे. या संदर्भात अग्रवाल यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र पाहा/9 शिरपूर टोलनाकाप्रश्नी जनहित याचिका दाखल (पान 1 वरून) राज्य रस्ते विकास महामंडळ व संबंधित अन्य कार्यालयासह धुळे-पळासनेर टोल प्लाझा कंपनीकडून माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती़ मिळालेली माहिती व इतर बाबींमध्ये तफावत दिसल्याने त्यांनी 2013 मध्ये जनहित याचिका दाखल केली होती़