शिरुड येथे माजी सभापती, सरपंचाने केली ग्रामसेवकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2017 05:26 PM2017-06-15T17:26:27+5:302017-06-15T17:26:27+5:30

अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. तर

At Shirud, the former Speaker, the Sarpanch had beaten Gramsevak | शिरुड येथे माजी सभापती, सरपंचाने केली ग्रामसेवकास मारहाण

शिरुड येथे माजी सभापती, सरपंचाने केली ग्रामसेवकास मारहाण

Next

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 15 - अमळनेर तालुक्यातील  शिरूड येथील ग्रामसेवकाला पंचायत समितीचे माजी सभापती आणि सरपंचाने मारहाण केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. तर सरपंचानेही ग्रामसेवकाविरूद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
शासकीय योजनांच्या भ्रष्टाचाराबाबत विचारणा करण्यावरून पंचायत समितीचे  माजी सभापती  किशोर पाटील आणि सरपंच बापूराव भिवसन पाटील यांचे ग्रामसेवक विलास  सोनवणे यांच्याशी वाद झाले. दप्तर पहाणीवरून शाब्दिक चकमक झाली.  सरपंच बापूराव  पाटील यांनी 15 रोजी सकाळी साडे दहा वाजता ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाला धरून ठेवले. तर  किशोर पाटील यांनी ग्रामसेवकाच्या कानशिलात मारली. पोटाला डोक्यावर मारहाण करून शिवीगाळ केली अशी तक्रार ग्रामसेवकांने दिली. त्यावरून  अमळनेर पोलीस स्टेशनला  किशोर पाटील व बापूराव  पाटील यांच्या विरुद्ध  सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला.
   तसेच सरपंच बापूराव भिवसन पाटील यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, ग्रामपंचायत अपहाराची विचारपूस केल्याचा राग आल्याने ग्रामसेवक विलास सोनवणे यांनी शिवीगाळ  केली. तसेच तुमच्याविरुद्ध खोटी तक्रार करेल अशी धमकी दिली म्हणून ग्रामसेवकाविरूद्ध   गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Web Title: At Shirud, the former Speaker, the Sarpanch had beaten Gramsevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.