भुसावळ विधानसभेतील शिवसंपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:55+5:302021-07-16T04:12:55+5:30
अभियानास वरणगावातून सुरुवात वरणगाव : भुसावळ विधानसभा क्षेत्रातील शिवसंपर्क अभियानाची सुरुवात वरणगाव शहरात महिला आघाडी संपर्क संघटक ...
अभियानास वरणगावातून सुरुवात
वरणगाव : भुसावळ विधानसभा क्षेत्रातील शिवसंपर्क अभियानाची सुरुवात वरणगाव शहरात महिला आघाडी संपर्क संघटक उषा मराठे (मुंबई) यांच्या हस्ते गुरुवारी झाली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, महिला आघाडी जिल्हा संघटक पूनम बऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक ९ मधून करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना बळकटीकरणासाठी तसेच महिला आघाडी सबलीकरणासाठी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा व ठाकरे सरकारने केलेली कामे व सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन केले.
दर प्रसंगी उपजिल्हा संघटक विलास मुळे, प्रा. उत्तम सुरवाडे, संतोष सोनवणे, सईद मुल्ला, सुभाष चौधरी, पं.स. सदस्य विजय सुरवाडे, जि.प. सदस्या सरला कोळी, भुराबाई चव्हाण, योगिता सोनार, तृप्ती महाजन, भुसावळ शहर प्रमुख नीलेश महाजन, नामदेव बऱ्हाटे, राहुल बावणे, सागर वंजारी, दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.